गंगापूर शहरात मटक्यावर पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाची मटका जुगार अड्ड्यावर धाड तिघांवर कारवाई .


गंगापूर(प्रतिनिधी) पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या शहरासह ग्रामीण भागात अवैध चक्री,मटका सर्रास सुरु असताना याकडे पोलिसांचे दुर्लक्ष दिसून येत आहे. दरम्यान गुरुवारी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने दुपारी पंचायत समिती समोर पत्र्याच्या शेडमध्ये मटक्यावर छापा टाकून या ठिकाणाहून तीन जणांना ताब्यात घेवुन त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या वरुण परिसरात अवैध व्यवसाय सुरु असल्याचे सिद्ध झाले हे मात्र निश्चित आहे. दरम्यान गंगापूर पोलिस याची दखल घेऊन अवैध धंद्यावर आळा घालतील काय अशी चर्चा आहे.
पोलिस ठाणे हद्दीत गंगापूर वैजापूर रोडवरील पंचायत समितीच्या समोर अवैध मटका सुरु असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रमुख मधुकर मोरे यांना मीळाली. त्यावरून त्यांनी २३ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता आपल्या पथकासह शेडमध्ये सुरु असलेल्या अवैध मटक्यावर छापा टाकला असता राहुल सुभाष अन्नदाते राहणार भानसहिवरा ता नेवासा,सुरेश काळे राहणार नेवासा,नारायण घाटे राहणार शिंगी तालुका गंगापूर. हे लोकांकडून मटका जुगारावर पैसे घेऊन खेळत व खेळवीत असताना मिळून आल्याने त्यांच्याकडून मोबाईल ,नगदी रुपये, व जुगाराचे साहित्य असा एकूण ८१ हजार ७० रुपयांचा माल हस्तगत करून वरील लोकांविरुद्ध पोलीस ठाणे गंगापूर येथे मुंबई जुगार अधिनियम कलम १२ (अ)नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे पोलिस उपनिरीक्षक मधुकर मोरे ,पोह रविंद्र लोखंडे, विठ्ठल डोकें, गोपाल पाटील यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!