मैत्रीच्या नात्याला काळीमा अल्पवयीन मुलीवर उसाच्या शेतात नेऊन मित्राने केला बलात्कार!, गंगापूर तालुक्यातील खळबळजनक घटना


गंगापूर (प्रतिनिधी) सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलींबरोबर काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन एकविस वर्षीय मुलाने नेवासा शिवारात ऊसाच्या शेतात नेऊन बलात्कार केल्या प्रकरणी सागर मिरगे वर बलात्कार व पोस्को नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार
सागर शिवाजी मिरगे (२१) राहणार जातेगाव,ता. वैजापूर याने गंगापूर तालुक्यातील घोडेगाव येथील नात्यातील १७ वर्षीय तरुणी बरोबर ओळख झाली जून २०२२ पासून ते एकमेकांना ओळखतात ओळखीतून दोघांनी एकमेकांसोबत फोटो काढले होते.काही दिवसांनी हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत सागरने तिला दुचाकीवर बसवले आणि नेवासाजवळील एका ऊसाच्या शेतात नेत जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यासोबत जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
नंतर तिला तेथेच एकटी सोडून पळून गेला.त्यानंतर पुन्हा काही दिवसांनी पाठलाग करून तिला गाठले आणि पुन्हा शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. तरुणीने त्याला
नकार दिला. मात्र त्याने धमकावणे सुरूच ठेवल्याने अखेर तिने गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये २९ फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहाला तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी सागरविरुद्ध कलम ३२८,३५४,३६३ ३७६, भादवी बलात्कारासह पोक्सोचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पिंक पथकाचे पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर साखळे व शशिकांत तायडे हे करत आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!