गंगापूर पोलीसांनी अहमदनगर येथे मुख्य गांजा तस्कराच्या मुसक्या आवळल्याने गंगापूर पोलिसांच्या कामगीरीचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे


गंगापूर (प्रतिनिधी) गंगापूर पोलीसांनी दोन दिवसांपूर्वी २८ किलो गांजासह एकाला अटक केली होती यातील मुख्य आरोपी संदीप अशोक भाबंरकर याला गंगापूर पोलिसांनी अहमदनगर येथील राहत्या घरातुन १ मार्च रोजी पहाटे दिड वाजता शिताफीने पकडल्या मुळे नगर जिल्ह्यात गंगापूर पोलिसांच्या कामगीरीचे कौतुक करण्यात आले


गंगापूर पोलीसांनी छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्गावरील ढोरेगांव येथील पुलाजवळील धाब्यावर सापळा रचून शिर्डी येथील गांजा तस्कर राहुल जाधव याला पकडले होते त्याला माल कोणी दिला याची विचारणा केली असता त्यांने अहमदनगर येथील मुख्य गांजा तस्कर संदीप अशोक भाबंरकर यांच्याकडून माल घेऊन विकत असल्याचे सांगितल्यावरुन पोलिस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले यांनी विशेष पथक तयार करून अहमदनगर येथे २९ फेब्रुवारी रोजी पाठवले असता या पथकाने १ मार्चला पहाटे दिड वाजता अहमदनगर पोलिसांच्या मदतीने संदीप याला राहत्या घरातून शिताफीने पकडले असून याला गंगापूर न्यायालयात उभे केले असता त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे तर राहुल जाधव याला दोन दिवस कोठडी देण्यात आली होती. ही कारवाई पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया व अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार व उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ सिध्देश्वर भोर यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले, पोलीस उपनिरीक्षक अझहर शेख, पोलीस अंमलदार
विजय नागरे, अनिरुद्ध शिंदे यांनी केली तर पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अझहर शेख हे करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!