संतापजनक व -हदयद्वारक.उपचाराअभावी रस्त्यावर प्रसुती झालेल्या नवजात अर्भकाचा मृत्यू. लासुरस्टेशन येथील घटना. १०२ व १०८ रुग्णवाहिका नावालाच फोन करूनही आल्या नाहीत. महीलेच्या उपचारासाठी अर्भकाला झाडाला झोळीत लटकवले


गंगापूर (प्रतिनिधी) लासुरस्टेशन येथील गरोदर महिलेची रुग्णवाहिका वेळेवर न आल्याने प्रसुती झाली परंतु उपचाराअभावी नवजात अर्भकाचा मृत्यू झाला खाजगी दवाखान्यात घेण्यास डॉक्टरांनी नकार दिला तर प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ कर्मचारी गैरहजर असल्याने बाळ दगावले व गरोदर महिलेची प्रकृती खालावल्याने ग्रामस्थांच्या सहकार्याने छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून महिलेवर उपचार सुरू. नवजात मृत अर्भकाला नातेवाईकाला झाडाला बांधण्याची वेळ

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लासूर स्टेशन येथील पंचशील येथील गरोदर महिलेला प्रसुतीच्या वेदना सुरू झाल्याने पतीने एका खाजगी दवाखान्यात प्रसूतीसाठी नेले असता डॉक्टरांनी उपचारास नकार दिला तर लासूर स्टेशनचे प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्री कोणीही हजर नसल्याने खासगी रुग्णालयात दाखल करुन न घेतल्याने रस्त्यावर प्रसूती केल्यानंतर जन्मास आलेल्या नवजात बाळाला वेळीच योग्य उपचार न मिळाल्याने त्याचा २५ एप्रिल रोजी रात्री मृत्यू झाला. ही गंभीर घटना लासूर स्टेशन येथे घडली असून याबाबत मृत पावलेल्या नवजात बाळाच्या वडिलांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी रुग्णालय प्रशासनाकडे केली आहे.
प्रसुतीसाठी असलेल्या १०२ रुग्णवाहिका नावालाच.
गरोदर महिलांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी शासनाच्या १०२ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून मोफत सेवा देणे नियमाने बंधनकारक होते. परंतु, तालुक्यातील आरोग्य यंत्रणेच्या बेजबाबदार कारभारामुळे त्यांच्या बाळाला रुग्णालयाकडून कोणतीही सेवा मिळाली नाही. वेळेवर रुग्णवाहिका न आल्याने महीला रस्त्यावर बाळंत झाली परंतु उपचाराअभावी बाळाचा मृत्यू झाला . महीलेला स्थानिकांनी उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल केले.व मृत बाळाला घरासमोरील झाडाला झोळीत बांधून ठेवावे लागले ही लाजीरवाणी बाब आहे या घटनेला जबाबदार असलेल्या कुचकामी यंत्रणेची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!