कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत वाळुज व लिंबे जळगाव येथे भाजीपाला मार्केट सुरू करणार- सभापती भाऊसाहेब पदार

कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत वाळुज व लिंबे जळगाव येथे भाजीपाला मार्केट सुरू करणार- सभापती भाऊसाहेब पदार

गंगापूर (प्रतिनिधी)वाळुज व लिंबे जळगाव येथे भाजीपाला मार्केट सुरू करुन शेतकरी हित व बाजार समितीच्या उत्पन्न वाढीसाठी बाजार समितीत खरेदीदार व्यापाऱ्यांची संख्या वाढविणार सभापती भाऊसाहेब पदार

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची ५४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा २७ सप्टेंबर रोजी संपन्न झाली.​
सभेच्या अध्यक्षस्थानी समितीचे सभापती भाऊसाहेब पदार होते.तर किशोर धनायत, नंदकुमार गांधीले, भाजपचे नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष रवींद्र चव्हाण, खरेदी विक्री संघाचे चेअरमन लक्ष्मण भुसारे, डॉ ज्ञानेश्वर निळ उपसभापती सचिन काकडे,यांची प्रमुख उपस्थिती होती येथील बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला दुपारी एक वाजता समितीच्या कार्यालयाच्या आवारात सुरूवात झाली होती समितीचे सचिव एस. जी. गजभिये यांनी इतिवृत्त वाचन केले या वार्षिक सर्वसाधारण सभेत शेतकरी हित व बाजार समितीच्या उत्पन्न वाढीसाठी बाजार समितीत खरेदीदार व्यापाऱ्यांची संख्या वाढविणे आदी प्रमुख मुद्द्यांवर साधकबाधक चर्चा होऊनआदीं विषयासह अजेंड्यातील सर्व विषयांना उपस्थित शेतकऱ्यांनी हात उंचावून मंजुरी दिली. नवीन शासन नियमानुसार संपन्न झालेल्या बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीनंतर प्रथमच झालेल्या या सर्वसाधारण सभेला कृऊबा सदस्य भारत पाटील, दिपक बडे रामेश्वर गवळी, दत्तात्रय दुबिले, उमेश बाराहाते. नारायण बाराहाते, सुवर्णाताई संजय जाधव, अर्चनाताई कृष्णा सुकासे, दीपक जाधव, सतीश डेडवळ, सुशीलाबाई भाऊसाहेब राजगिरे, नवनाथ सुराशे, जाफर इस्मैल शेख, आप्पासाहेब हिवाळे, तौफिक उस्मान पठाण, दामोधर नवपुते, कृष्णा सुकासे, कृष्णकांत व्यवहारे, अतुल रासकर, ताराचंद दुबिले, भारत पाटील, आदींसह शेतकरी,व्यापारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!