बापाला दारू का पाजली म्हणून एकाचा चाकूने भोसकून खून; स्थानिक व गुन्हे शाखेच्या व पोलिसांनी चार तासात दोन मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळल्या

खुलताबाद (प्रतिनिधी)
खुलताबाद तालुक्यातील टाकळी राजेराय येथे माझ्या वडलाला दारु का पाझली म्हणत एकाचा चाकुने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना बुधवारी संध्याकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास घडली. बबन कुचे (50) रा.टाकळी राजेराय  असे मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी संशयावरून आरोपींच्या वडलाला ताब्यात घेतले होते,दोन मुख्य आरोपी फरार झाले होते. दरम्यान मयत बबन कुचे यांच्या पत्नीच्या फिर्यादीवरून रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बबन कुचे हे आपल्या घरी असताना करण नामदेव बनकर व सुरज (टगा) नामदेव बनकर या दोन सख्ख्या भावांनी माझ्या वडलाला दारु का पाझली म्हणत बबन कुचे यांच्यावर काठी कुऱ्हाडीने हल्ला केला व नंतर चाकू भोसकुन खून केला. दरम्यान बबन कुचे यांना जख्मी अवस्थेत खुलताबाद येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच उप विभागीय पोलिस अधिकारी मुकुंद आघाव यांनी घटनास्थळी व ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन मृत बबन कुचे यांच्या खुनाची चौकशी करून फरार आरोपींना शोधण्यासाठी पोलीस स्टेशन खुलताबादचे पथक पोलिस उपनिरीक्षक विजयकुमार वाघ, हे काॅ नवनाथ कोल्हे, मनोज घोडके, भगवान चरावंडे,प्रमोद साळवी, विशाल भालेराव, अंकुश सरोदे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विजय जाधव, पोहेका दिपेश नागझरे, पोना गणेश गांगवे, तसेच सीडीआर विभागाचे योगेश तरमळे यांनी फरार दोन्ही आरोपीच्या मुसक्या आवळल्या दरम्यान या घटनेमुळे टाकळी राजेराय परिसरात तणावाचे व भितीचे वातावरण निर्माण झाले होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!