आमदार प्रशांत बंब यांच्या संकल्पनेतून पंचाहत्तर बेरोजगार तरुणांना दीडशे गायीचे वाटप

खुलताबाद (प्रतिनिधी) आमदार प्रशांत बंब यांच्या संकल्पनेतून पंचाहत्तर बेरोजगार तरुणांना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड यांच्या हस्ते दीडशे गायीचे वाटप करण्यात आले.

खुलताबाद तालुक्यातील धामणगांव येथे गुरुवार ११ मे रोजी सकाळी ११ वाजता आयोजीत कार्यक्रमाला विधानसभा माजी अध्यक्ष हरीभाऊ बागडे,राहता नगराध्यक्ष राजेंद्र पिपाडा, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष एल जी गायकवाड, सुहास शिरसाट, समीर राजूरकर, मोहन मालवतकर, किशोर धनायत, शिवनाथ मालकर, रामेश्वर मुंदडा, भिमराव खंडागळे, सभापती दिनेश अंभोरे , प्रकाश वाकळे, अविनाश कुलकर्णी,परसराम बारगळ, ज्ञानेश्वर नलावडे, जिल्हा परिषद सदस्य मधुकर वालतुरे, नंदकुमार गांधीले, संतोष जाधव, शेषेराव जाधव,यांच्या प्रमुख उपस्थितीत ७५ युवकांना १५० गायी वाटप करण्यात आल्या.
यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की या गायींचे चांगल्या प्रकारे जतन करून दोन गायींच्या चार चारच्या सहा गाया करुन दाखवा.आमदार प्रशांत बंब यांनी गंगापूर खुलताबाद तालुक्यात जलसंधारणाची मोठ्या प्रमाणात कामे करुन परिसरातील शेतीला सुजलाम सुफलाम केले. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी सांगितले की उद्योगासाठी बेरोजगार युवकांना बॅंकेकडुन कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करु वैजापूर तालुक्यातील शंभर युवकांना बॅंकेकडुन उद्योजकांना कर्ज उपलब्ध करून देण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार प्रशांत बंब म्हणाले की माझ्या मतदार संघातील तरुणांनांनी नोकरीच्या मागे न लागता स्वयंम रोजगारावर भर द्यावा.मतदार संघातील युवकांसाठी तब्ब्बल 2700 गायी पंजाब /हरियाणा येथून खरेदी केल्या असून, आणखी दीड हजार गाई खरेदी करणार आहे.मतदारसंघातील युवकांनी मुद्रा लोण, पीएमईजीपी, सिएमईपिजी, मुलांना जे वाटत असेल त्या उद्योगाचा प्रोजेक्ट माझ्याकडे आणुन द्यावे मी त्यांना सर्व परीने मदत करणार असल्याचे सांगितले.
यावेळी दत्तू हिवाळे, सुरेश जाधव, गणेश व्यवहारे, विकास कापसे, अरुण आघाडे, सचिन आहेराव, सोमनाथ तुरेवाले, सुखदेव झुरळे, संजय पांडव, विलास सोनवणे ,अनिल चव्हाण, बाळासाहेब वाघ ,दीपक बडे, कृष्णा सुकासे, भाऊसाहेब पदार, अरुण आघाडे, अनिल घुगे, रज्जाक पठाण, रवी चव्हाण, गोपाल वर्मा ,कृष्णकांत व्यवहारे, दत्तू कराळे ,योगेश गोटे, कल्याण पवार, राजू गायकवाड, आप्पा जगदाळे, सतीश खंडागळे, मनीष पोळ, अशोक सौदागर, गणेश आदाने, बंडू शिंदे, राहुल चव्हाण, अमोल जाधव, नारायण वाकळे, गणेश सजगुरे, दीपक साळवे, मारुती खैरे, राजेंद्र राठोड, शिवप्रसाद अग्रवाल, नवनाथ सुराशे, वैभव विधाते ,रामेश्वर मालुसरे, वैभव धनायत,अमीत मुंदडा,उमेश बाराहाते, आदींसह कार्यकर्ते नागरिक व लाभार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार प्रशांत बंब यांनी तर आभार विनोद पाटील यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!