पुन्हा शिक्षकांचा मुद्दा ऐरणीवर, मुख्यालयी राहावेच लागेल नसता कारवाई होणार; आमदार प्रशांत बबं

खुलताबाद (प्रतिनिधी) तालुक्यातील सर्व सामान्य जनतेला आपले प्रश्न उघडपणे मांडता यावे ते लवकरच निकाली निघावे यासाठी आमदार प्रशांत बंब यांच्या अध्यक्षतेखाली १६ डिसेबंर रोजी आमसभा घेण्यात आली.
तालुक्याच्या विविध विकास कामांबाबत चर्चा करण्याबरोबरच नवीन विकास कामांचे नियोजन करण्यासाठी या आमसभेचे आयोजन पंचायत समितीच्या प्रांगणात करण्यात आले होते, या आमसभेच्या सुरुवातीला केंद्र सरकारच्या भारत विकास संकल्प यात्रेच्या विकास रथाचे पुजन आ. बंब यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर सुरु झालेल्या आमसभेत प.स. अंतर्गत घरकुल योजने अंतर्गत चांगले काम केलेल्या तीसगांव तांडा, बाजारसावंगी, वेरुळ या ग्रामपंचायतींना प्रमाणपत्र देवुन सन्मान करण्यात आला.
या आमसभेत फुलंब्री खुलताबाद या रस्ता क्रमांक ७५२ प्रश्न चांगलाच गाजला, या रस्त्याचा कामाचा अहवाल सर्व पुराव्यांसह आपण तयार केला असुन, येत्या दोन महिन्यात सदरील रस्ता मानांकाप्रमाणे झाला आहे की नाही याचा अहवाल द्यावा, या बाबतची गंभीर तक्रार पंतप्रधान कार्यालयाकडे करणार असल्याचे या वेळी आ. बंब यांनी स्पष्ट केले.

मुख्यालयी राहत नसल्याचा मुद्दा चर्चिला गेला, विशेषतः शिक्षकांना अजुनही संधी, अन्यथा न्यायालयीन आदेशान्वये निलंबनाची कारवाई अटळ असल्याचे आ.बंब यांनी यावेळी सांगितले.

या आमसभेला तहसीलदार स्वरुप कंकाळ, गट विकास अधिकारी प्रकाश नाईक, न.प. मुख्याधिकारी विक्रम दराडे, वनपरिक्षेत्र अधिकारी अण्णासाहेब पेरकर पोलीस निरीक्षक भुजंग हातमोडे, तालुका कृषि अधिकारी ज्ञानेश्वर तारगे भाजपा तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर नलावडे माजी सभापती गणेश आधाने, माजी बांधकाम सभापती संतोष जाधव, कृऊबा सभापती भाऊसाहेब पदार तालुका अध्यक्ष रवींद्र चव्हाण, रज्जाक पठाण,गोपाल वर्मा,यांच्या सह माजी जि.प. उपाध्यक्ष एल.जी. गायकवाड, माजी उपसभापती दिनेश अंभोरे, प्रकाश वाकळे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!