गंगापूर सहकारी साखर कारखाना संचलित जयहिंद शुगर देणार २७११ रुपये टन ऊसाला भाव.१५ वर्षांनंतर कारखान्याची फिरली चाके


गंगापूर(प्रतिनिधी) तालुक्यातील ऊस उत्पादकांना दिलासा पंधरा वर्षांनंतर गंगापूर साखर कारखान्याची फिरली चाके जिल्ह्यातील कारखान्यांपेक्षा सर्वाधिक दर देणार जयहिंदचा मोठा निर्णय

गंगापूर सहकारी साखर कारखाना संचलित जयहिंद शुगर प्रा लीमीटेड जामगांव साखर कारखाण्याने २ हजार ७११ रुपये भाव जाहीर केला असुन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे
गंगापूर सहकारी साखर कारखाना जयहिंद शुगर मिलने भाडे तत्त्वावर घेतला असून कारखान्याची ट्रायल (चाचणी) घेतली असून आठ ते दहा दिवसांच्या आत प्रत्यक्ष ऊस गाळपाला सुरुवात करण्यात येणार असून ऊस दर २७११ रुपये प्रती मेट्रीक टन जयहिंद शुगरच्या सुश्मिता विखे यांनी जाहीर केला आहे.
गंगापूर तालुक्यातील जामगांव येथील जयहिंद शुगर प्रा लिमिटेडने तालुक्यातील
ऊस उत्पादकांना दिलासा मिळाला आहे गंगापूर तालुक्यातील जामगाव येथील जयहिंद शुगर प्रा लीमीटेड गंगापूर साखर कारखाना
पंधरा वर्षापासून बंद असलेला कारखान्यांत आता नवीन मशनरी बसवून थोड्या कालावधीत हा कारखाना सुरू केला
२०२३-२४ या चालू गळीत हंगामात गाळपास येणाऱ्या उसास प्रति मेट्रिक टन २७११ रुपये एक रकमी भाव देण्यात येणार आहे. जिल्ह्यात व पश्चिम महाराष्ट्र जवळ असलेल्या अनेक साखर कारखाने असून त्यापैकी जयहिंद शुगर प्रा लीमीटेड संचलित गंगापूर साखर कारखानेही सर्वात जास्त दर दिल्याचे दिसत आहे.
जयहिंद शुगर प्रा लीमीटेड संचलित
गंगापूर कारखाना सुरू होणार असल्याने शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण पसरले आहे. यंदा अडीच लाख मेट्रीकटन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असल्याचे कारखान्याचे कार्यकारी संचालक अविनाश शिंदे यांनी सांगितले. जय हिंद शुगर मिलतर्फे अहोरात्र काम करून पाच महिन्यात कारखान्यासह डिस्टलरी प्रकल्पाचे विस्तारीकरण पूर्ण झाले आहे. या कामासाठी सुमारे पस्तीस कोटी रुपये खर्च झालेले आहे, अशी माहिती सुष्मिता विखे यांनी दिली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!