शेतकऱ्यांच्या माथी नको ते खत मारणा-या (लिंकिंग) करणाऱ्या खत कंपन्या व एक्स भाडे देणाऱ्या कंपन्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी नसता रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा झुंजार छावा संघटनेने दिला

शेतकऱ्यांच्या माथी नको ते खत मारणा-या (लिंकिंग) करणाऱ्या खत कंपन्या व एक्स भाडे *देणाऱ्या कंपन्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी१ नसता रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा झुंजार छावा संघटनेने दिला
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) मार्च ते जुलै दरम्यान युरिया सोबत इतर विद्राव्य खते, व वॉटर सुलेबल खते , बायो पोटॅश , व 20.20.0.13 नामांकित कंपन्या लिंकिंग करून शेतकऱ्यांच्या माथी मारत असल्याने शेतकरी व दुकानदारांना आर्थिक नुकसान होत असल्याने पंधरा दिवसाच्या आत मध्ये सर्व संभाजीनगर जिल्ह्यातील कृषी विक्रेते रिटेलर डीलर यांना न्याय न मिळवून दिल्यास झुंजार छावा संघटनेच्या वतीने ए एस क्लबवर रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा झुंजार छावा संघटनेने दिला आहे
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील रासायनिक खत कंपन्यांनी आलेल्या युरिया रॅक सोबत केलेली लिंकिंग मंगला फर्टीलायझर. जिवन.नागार्जुन फर्टीलायझर ,वॉटर सुलेबल, व पेस्ट साईड,चंबल फर्टीलायझर, वॉटर सुलेबल व इतर एनपीके .नॅशनल फर्टीलायझर, सल्फर ,पी. डी .एम पोटॅश,कुंभको लिमिटेड . इतर एन .पी.के इ.फ.को फर्टीलायझर. सागरीका ,नर्मदा बायो . बायो पोटॅश, आर .सी .एफ. ड्रीप वॉटर सुलेबल खते .जी. एस. एफ .सी वॉटर सुलेबल ,जय किसान नवरत्न बकेट, वॉटर सुलेबल, व इतर खते. आय .पी .एल . पोली हायलाईट ,दीपक फर्टीलायझर. सल्फर , व इतर एन .पी.के युरिया खता सोबत या कंपन्या डीलर यांना लिंकिंग करतात. त्यामुळे युरिया कोणत्याच कंपनीचे डीलर हे रिटेलर डीलर यांना प्लेन मध्ये देत नाही . त्यामुळे युरिया हा शेतीसाठी जीवन आवश्यक असल्यामुळे रिटेलर डीलर कृषी विक्रेता हा युरिया लिंकिंग मध्ये विकत घेतात .व काही कंपन्या तर युरिया एक्स भाडे मध्ये देतात. त्यामुळे हा युरिया प्रति बॅग हा 290 रुपयांना रिटेलर डीलर यांना पडतो. त्यामुळे युरिया सोबत लिंकिंग शेतकरी बांधवांना नाईलाजाने खरेदी करावे लागते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील या सर्व खत विक्रेते कंपन्या वर कृषी विकास अधिकारी A.D.O. प्रकाश पाटील व उपसंचालक दिवटे यांना दिलेल्या निवेदन म्हटले आहे आपण स्वतः या प्रकरणांमध्ये लक्ष घालून मनमानी करणाऱ्या खत कंपन्यावर लिंकिंग करणाऱ्या व एक्स भाडे देणाऱ्या कंपन्यावर नियमानुसार कायदेशीर कारवाई करून .संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व रिटेलर डीलर यांना न्याय मिळवून द्यावा. आपण जर पंधरा दिवसाच्या आत मध्ये सर्व संभाजीनगर जिल्ह्यातील कृषी विक्रेते रिटेलर डीलर यांना न्याय मिळवून न दिल्यास झुंजार छावा संघटनेच्या वतीने संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते व शेतकरी बांधव यांना सोबत घेऊन संभाजीनगर जिल्ह्यातील ए एस .क्लब .येथील मुख्य छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल.असा ईशरा कृष्णा पाटील पऱ्हाड मराठवाडा अध्यक्ष व अरुण पाटील नवले महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष झुंजार छावा संघटना महाराष्ट्र राज्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!