गंगापुर शहरात शिवशाही बस व ट्रकचा अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान जीवितहानी टळली… गतीरोधक असते तर अपघात टळला असता..

गंगापुर शहरात शिवशाही बस व ट्रकचा अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान जीवितहानी टळली .
गतीरोधक असते तर अपघात टळला असता. गतीरोधक टाकण्याची मागणी


गंगापुर (प्रतिनिधी)गंगापूर वैजापूर रोडवर कृषी उत्पन्न बाजार समिती समोर शिवशाही बसने ट्रकला मागून धडक दिल्याने बसचे मोठे नुकसान झाले असून यात जीवितहानी टळली हा अपघात २५ जुलै रोजी सकाळी सव्वा दहा वाजेच्या सुमारास घडला. या रोडवर शाळा महाविद्यालय व शासकीय कार्यालये असल्याने गतीरोधक टाकण्याची मागणी विद्यार्थी व पालकांनी केली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ट्रक क्रमांक एम एच १५ यु १७११ हा गंगापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जात असताना वैजापूर कडून येणाऱ्या महामंडळाच्या शिवशाही बसने ( एम एच ०६ बी डब्ल्यू ०४९४ ) ट्रकला मागून जोराचे धडक दिल्याने दोन्ही गाड्याचे नुकसान झाले मात्र सुदैवाने या जीवित हानी झाली नसली तरी बसला होणारे वारंवार अपघाताचा मुद्दा ऐरणीवर आल्याचे दिसून येत आहे.
याप्रकरणी ट्रक चालक दस्तगीर चाँद साब सौदागर वय २७ रा. डिग्गी ता. उमरगा जि. उस्मानाबाद यांच्या फिर्यादीवरून बस चालक रावसाहेब चंद्रभान बांगर रा. नाशिक यांचे विरुद्ध गंगापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पो नि. सत्यजित ताईतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह.घोडके हे पुढील तपास करीत आहेत

स्पीड ब्रेकर (गतीरोधक)टाकण्याची मागणी

गेल्या दोन दिवसात याच परीसरात वाहनांच्या भरधाव वेगामुळे तीन वेगवेगळे अपघात झाले आहेत. याच परिसरात शाळा महाविद्यालय आयटीआय व तहसील कार्यालय असल्याने या परिसरात पायी चालणाऱ्यांची व विद्यार्थ्यांची वर्दळ मोठ्या प्रमाणात आहे तसेच रस्ता चांगला असल्याने वाहनांची गती अधिक असते त्यामुळे भविष्यात येथे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही यासाठी रस्त्यावर गतीरोधक (स्पीड ब्रेकर) टाकण्याची मागणी विद्यार्थी व नागरीकांकडून अनेक दिवसापासून केली जात असून संबंधीत विभाग याकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.

अपघात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!