कत्तलीसाठी आणलेल्या ९ गायींची स्थानिक पोलिसांनी केली सुटका, अनेक दिवसांपासून सुरू होता कत्तलखाना.. गोमांस विक्रीसाठी मुंबई येथे नेण्यात येत होते

कत्तलीसाठी आणलेल्या ९ गायींची स्थानिक पोलिसांनी केली सुटका, अनेक दिवसांपासून सुरू होता कत्तलखाना

*गोमासविक्रीसाठी मुंबई येथे नेण्यात येत होते*
गंगापूर (प्रतिनिधी)शहरातील ख्वाजा नगर मधील एका पत्र्याच्या शेडमध्ये ९ गायी कत्तलीसाठी बांधून ठेवण्यात आल्या होत्या कत्तलीसाठी आणलेल्या या गायींची पोलिसांनी सुटका केली.या कत्तलखान्यातुन मुंबई येथे गोमांस विक्रीसाठी नेत असल्याची चर्चा सुरू होती.
पोलिसांनी या प्रकरणी कत्तलखाना चालका विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरा पर्यंत सुरू होते.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गंगापूर शहरातील ख्वाजानगरमध्ये ९ गायी कत्तलीसाठी बांधून ठेवण्यात आल्या असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले यांना मिळाली असता सपोनि अशोक चौरे, सहाय्यक फौजदार गणेश काथार पोहेका राहुल कांबळे, अभिजीत डहाळे,राहुल वडमारे, मनोज नवले, आदींनी २६ जुलै रोजी रात्री दहा वाजता ही कारवाई करण्यात आली. कत्तलखाना चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम बातमी लिही पर्यंत सुरू होती. ही कारवाई पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया.अप्पर पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्यासह पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले व त्यांच्या टीमने केली.
या ठिकाणी गेल्या कित्येक दिवसांपासून गोवंश कापून त्याचे मांस मुंबई येथे विक्रीसाठी पाठवत असल्याची चर्चा परिसरात सुरू होती हा कत्तलखाना चालविणारे गंगापूर व शहरातील नसुन दुसऱ्या तालुक्यातील असल्याचे बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!