अखेर आमदार प्रशांत बंब यांच्या एका महिन्यांच्या पाठपुराव्यामुळे गंगापूर उपविभागाच्या विभाजनाला महावितरण विभागाची मंजुरी

गंगापूर (प्रतिनिधी) आमदार प्रशांत बंब यांच्या पाठपुराव्याला यश गंगापूर उपविभागाचे विभाजनाला अखेर महावितरण विभागाची मंजुरी मागच्या 3 वर्षापासून आमदार प्रशांत बंब यांनी महावितरण विभागाच्या बैठका घेऊन सातत्याने पाठपुरावा केला तसेच 30 आक्टोंबर 2023 रोजी मुख्य अभियंता यांच्या दालनात झालेल्या व्हिडिओ काॅनफरन्स बैठकीत आमदार प्रशांत बंब,मुख्य अभियंता केळे म रा वि वि क औरंगाबाद अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली, कार्यकारी अभियंता पोहरकर म रा वि वि क ग्रामीण 2,उपकार्यकरी अभियंता भिवसेने गंगापूर उपकार्यकरी अभियंता उस्मान खान खुलताबाद यांच्या बैठकीत विभाजनाचा मुद्दा मंजूर करून घेतला यामुळे तालुक्याच्या वीज ग्राहकांच्या आणि महावितरण कंपनीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय मार्गी लागला आहे यामुळे वीज वितरण कंपनीचे मनुष्यबळ वाढणार आहे आणि गंगापूर तालुक्याला दोन उपकार्यकरी अभियंता काम पाहणार आहे जेणे करून लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी मदत होईल गंगापूर उपविभागाची विभाजण पुढील प्रमाणे गंगापूर विभाग १) गंगापूर शहर शाखा २) गंगापूर ग्रामीण १,३) गंगापूर ग्रामीण २,४)काटे पिंपळगाव,५) शिल्लेगाव. वाळूज (नवनिर्मित)१) वाळूज शाखा, २)रांजणगाव शाखा(नवनिर्मित), ३)तुर्कबाद,४)शेंदूरवादा,५) लासुर स्टेशन असे विभाजन करण्यात आले आहे. या विभाजनामुळे अभियंता आणि वायरमन यांच्यावरील ग्राहकांचा ताण कमी होऊन काम करण्यासाठी अतिरीक्त मनुष्यबळ मिळणार असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!