आ.प्रशांत बंब यांच्यामुळे गंगापूर/खुलताबाद तालुक्यात जलक्रांती नंतर येणार बेरोजगार तरुणांसाठी श्वेतक्रांती

खुलताबाद (प्रतिनिधी)उद्या युवकांना वाटणार दुधाळ असलेल्या होलस्टन जातीच्या 200 गाई दिवाळीपर्यंत वाटणार तब्ब्ल चार हजार दोनशे गाई,दहा वर्षांतर गायी भाकडं झाल्यानंतर गोशाळेत गोदान करावे लागणार ……
खुलताबाद तालुक्यातील धामणगांव येथे गुरुवार ११ मे रोजी सकाळी १०.०० वाजता केंद्रीय राज्य रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय राज्य अर्थमंत्री डॉ. भागवत कराड, , राज्य सहकार मंत्री अतुल सावे, हरीभाऊ बागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ७५ नवउद्योजकांना १५० गायी वाटप करण्यात येणार

सतत दुष्काळाचा चटके सहन करणारा मतदारसंघ म्हणून
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर/खुलताबादचे आमदार प्रशांत बंब यांनी तब्ब्बल 2700 गायी पंजाब /हरियाणा येथून खरेदी केल्या असून, आणखी दीड हजार गाई खरेदी करणार आहे. विशेष म्हणजे या गाई स्वतःसाठी नाही तर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या बेरोजगार तरुणांसाठी खरेदी केल्या जात आहे. गंगापूर- खुलताबाद मतदारसंघाचे आमदार तथा भाजप नेते प्रशांत बंब  यांनी हा अनोखा उपक्रम सुरु केला आहे. आपल्या मतदारसंघातील तरुणाच्या हाताला काम मिळावा म्हणून, आमदार बंब यांनी आगळीवेगळी योजना राबवली जाणार आहे राज्यातच नव्हे तर देशभरात बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनला आहे. फक्त शहरच नव्हे तर गावागावात बेरोजगार तरुणांची फौज पाहायला मिळतेय. अशातच मराठवाड्यातील एका आमदाराने या बेरोजगार तरुणांच्या हाताला रोजगार देण्यासाठी एक विशेष मोहीम सुरू केली आहे. ग्रामीण भागातील तरुणांना स्वावलंबी करण्यासाठी भाजप आमदार प्रशांत बंब यांनी ही मोहीम सुरू केली आहे. आपल्या मतदारसंघातील गरजू तरुणांना त्यांनी प्रत्येकी 2 दुधाळ जातीच्या होस्टन जर्सी गायी घेऊन दिल्या आहेत. त्यामुळे या दुग्ध व्यवसायातून ग्रामीण भागातील बेरोजगार तरुण महिन्याला सर्व खर्च वजा जाता 20 ते 21 हजार रुपयांची कमाई करणार आहेत.
आमदार बंब यांच्याकडून राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाला गीता बन प्रकल्प असे नाव देण्यात आले आहे. ज्यात एका शेतकऱ्याला दोन गायी देण्यात आल्या आहेत. एका गाईची किंमत 80 ते 90 हजार रुपये आहे. एक गाय दररोज 18 ते 20 लिटर दूध देते. त्यामुळे दोन गायींचे सुमारे 40 लिटर दूध मिळते. यासाठी अमूल डेअरी 27 रुपये लिटरप्रमाणे दूध विकत घेत आहे. 40 लिटरचे रोज 1480 रुपये मिळतात. ज्यात चारा, ढेप, सरकी, वैद्यकीय उपचार आदींसाठी दररोज 600 ते 700 रुपये खर्च लागतो. तो जाऊन महिन्याकाठी 20 ते 21 हजार रुपये उत्पन्न  महिन्याला होणार आहे. ज्यातील दरमहा 10 हजार रुपये बँकेत जमा करून दीड वर्षात गाय शेतकऱ्याच्या मालकीची होईल.

आणखी 1500 गायी घेतल्या जाणार 

आमदार प्रशांत बंब यांनी पहिल्या टप्प्यात पंजाबमधून 2300 गायी विकत घेतल्या आहेत. तसेच दिवाळीच्या वसुबारसपर्यंत आणखी 1500 गायी घेतल्या जाणार नाही. दूध विक्रीतून 750 तरुण स्वतःच्या पायावर उभे राहावेत यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आला असल्याची माहिती बंब यांनी दिली आहे. 

गायी देताना आमदार बंब यांनी शेतकऱ्यांना खालील पाच अटींचा समावेश घालून दिला आहे..

त्यात 1)लाभार्थी दुधाच्या व्यवसायात नसावा
2)त्याला किमान 1 एकर शेती असावी.
3)वासराला दररोज किमान 3 लिटर दूध पाजावे
4)शेतकऱ्यांच्या मुलांनाही मुबलक दूध द्यावे.
5)आणलेल्या गायींचे वय 2 ते 4 वर्षे आहे. त्या सरासरी 10 वर्षे दूध देतील. यानंतर भाकड गायी गोशाळेत पाठवणे बंधनकारक आहे त्यामुळे ही योजना कौतुकास्पद ठरणार आहे एकीकडे तरुणांमध्ये बेरोजगारीच्या मुद्द्यावरून सरकार विरोधात प्रचंड रोष आहे. अशातच आमदार प्रशांत बंब यांनी आपल्या मतदारसंघातील तरुणांना रोजगार देण्यासाठी सुरू केलेली योजना कौतुकास्पद ठरत आहे. त्यामुळे जे बंब यांनी केलं, ते इतर आमदार ही करतील का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!