जन्मदात्या वृध्द आईवर मुलानेच केला अत्याचार नात्याला काळिमा फासणारी घटना

जन्मदात्या वृध्द आईवर मुलानेच केला अत्याचार नात्याला काळिमा फासणारी घटना;
पीडित महिलेने हा प्रकार बहिणीला सांगितल्यानंतर तिला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले.

जालना (प्रतिनिधी) : एका मुलानेच जन्मदात्या वृध्द आईला मारहाण करून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना जालना तालुक्यातील एका गावात बुधवारी उघडकीस आली. नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे जिल्हा हादरून गेला आहे. दरम्यान, संशयित आरोपीला अटक केल्याची माहिती मौजपुरी पोलिस ठाण्याचे सपोनि. योगेश धांडे यांनी दिली.

जालना तालुक्यातील एका गावातील ६५ वर्षीय वृद्ध महिला आपल्या वृद्ध आणि अपंग पतीसोबत राहते. त्यांना एक २७ वर्षीय मुलगा आहे. हा मुलगा अविवाहित असून, बाहेरील जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या शेतात सालदार म्हणून कामाला आहे. १ मे रोजी हा मुलगा सुट्टी घेऊन गावी आला होता. रात्री जेवण झाल्यानंतर वृद्ध आई व नराधम मुलगा घराच्या अंगणात झोपले होते. त्यादिवशी त्याचे वडील घरी नसल्याने रात्री बारा वाजेच्यासुमारास मुलाने पायाला काहीतरी चावल्याचे सांगून आईला घरात नेले. त्यानंतर त्या मुलाने आईवर अत्याचार केला. विरोध केला असता, त्याने आईला मारहाण केली. त्यानंतर त्याने तीन ते चारवेळा आईवर अत्याचार केला. दुसऱ्या दिवशी संशयित हा निघून गेला होता. पीडित महिलेने हा प्रकार बहिणीला सांगितल्यानंतर तिला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून मुलाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच, मौजपुरी पोलिसांच्या पथकाने बुधवारी सकाळी संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती सपोनि. योगेश धांडे यांनी दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!