गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना..महाविद्यालयातील प्रतिष्ठित प्राध्यापकास विद्यार्थ्यांकडून बेदम चोप!


अहमदनगर (प्रतिनिधी) विद्यार्थिनीला अश्लील मेसेज पाठवणे प्राध्यापकाला पडले महागात ! विद्यार्थ्यांनी प्राध्यापकाला दिला चोप.नेवासा येथील प्रकार.प्राध्यापकांवर कारवाई करुन निलंबित करण्याची पालकांची मागणी .
अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा-तालुक्यातील एका महाविद्यालयात असणाऱ्या प्रतिष्ठीत प्राध्यापकाला नाजूक कारणावरून मारहाण झाल्याची चर्चा नेवासा शहरात रंगत चालली आहे
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नेवासा तालुक्यातील एका  महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीला नाजूक विषयाच्या अनुषंगाने त्रास देत असलेल्या प्रतिष्ठीत प्राध्यापकाला शहरातील बदामबाई शाळा कमानी जवळ आलेल्या जमावाने कपडे फाटूस्तर धुलाई केली त्यांनतर हा प्राध्यापक आलिशान गाडीतून नेवासा फाट्याकडे जात असताना एका महाविद्यालयासमोर ही जमावाने मारहाण केली तसेच नेवासा फाटा येथील शेवगाव रोड वर मारहाण केल्याची चर्चा ही नेवासा व फाटा परिसरात नागरिकांमध्ये सुरू होती.गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना असुन अशा प्राध्यापकांवर कारवाई करुन निलंबित करण्याची मागणी पालक वर्गातुन होत आहे.या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात अद्याप पर्यंत गुन्हा दाखल नसल्याची माहिती मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!