संतापजनक. अजब शिक्षकाचा गजब कारभार चक्क विद्यार्थ्यांच्या समोरच टेबलावर दारु पित विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन.. पालकांमध्ये संताप निर्लजपणाचा कळस..

वैजापूर(प्रतिनिधी) तालुक्यातील शिऊर येथील जिल्हा परिषद वस्ती शाळेत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, विद्येच्या मंदिरातच गुरुजींनी दारू पिण्याचा अड्डा बनवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाल्याने संतापाची लाट पसरली आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिऊर केंद्रांतर्गत येणाऱ्या बागायतदार वस्ती शाळेवरील शिक्षक शाळेतील वर्गामध्ये टेबलावर चकन्यासह दारू पीत असल्याची बाब ग्रामस्थांना कळाली असता ग्रामस्थांनी शाळा गाठत सदरील शाळेत जाऊन पाहणी केली तेव्हा शाळेतील गुरुजी हे चक्कं खुर्चीवर बसून टेबलावर दारूचा ग्लास भरून दारू पीत असताना त्यांना दिसून आले,त्यांनी तेथेच गुरुजींचा व्हिडियो काढला अन् याबाबत गटविकास अधिकारी यांना माहिती दिली घटनेची माहिती मिळताच गटशिक्षणाधिकारी यांनी तात्काळ एक पथक तयार करून शाळेवर तपासणीसाठी पाठवले आहे या पथकाकडून शाळेचा पंचनामा करण्यात आला…दरम्यान सदरील शाळेमध्ये पथकाला दारूच्या बाटली आढळून आली आहे…
जर विद्येचे धडे शिकवणारे गुरुजीच विद्यार्थ्यांसमोर दारू पीत असतील तर विद्यार्थ्यांनी काय आदर्श घ्यावा अशा शिक्षकांमुळे समाज कसा सुधारनार .

आमदार प्रशांत बंब यांची शिक्षक व कर्मचारी मुख्यालयी राहण्याची मागणी योग्यच
शिक्षकांसह सर्व विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक करण्यात यावे अशी मागणी आमदार प्रशांत बंब यांनी अशा बोगस शिक्षक व कर्मचाऱ्यांनवर ग्रामस्थांचा वचक राहुन विद्यार्थी चांगले घडतील यासाठी शिक्षकांचा मुख्यालयाचा विषय उचलून धरला तो योग्यच आहे.अशा बेवड्या व काम चुकार शिक्षकांवर कारवाई करुन निलंबित करावे अशी मागणी पालकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!