वैजापूर हद्दीत समृद्धी महामार्गावरील अपघाताला कारणीभूत असलेल्या दोन आरटीओ व ट्रक चाकावर गुन्हा दाखल तिन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले.

समृद्धी महामार्गावरील अपघाताला कारणीभूत असलेल्या दोन आरटीओ व ट्रक चाकावर गुन्हा दाखल तिन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले


वैजापूर (प्रतिनिधी) पहाटे समृद्धी महामार्गावर झालेल्या टेम्पो ट्रॅव्हलर व ट्रकच्या झालेल्या भीषण अपघातामध्ये ट्रकचा ड्रायव्हर व दोन आरटीओ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याची मोठी बातमी समोर येत आहे

मिळालेल्या माहितीनुसार बुलढाण्याहून सैलानी बाबा येथून दर्शन घेऊन परतत असताना वैजापूर तालुक्यातील अगरसायगाव शिवारात समृद्धी महामार्गावर चॅनल क्रमांक 483 जवळ मुंबई कॉरिडॉर मध्ये आरटीओ अधिकाऱ्यांनी ट्रकला कारवाई करण्याकरिता रस्त्याच्या कडेला उभे करण्याचे निर्देश दिले होते ट्रक उभा करता त्या ठिकाणी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलर ट्रकला धडकली ज्यामध्ये एकूण बारा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला मृतांमध्ये १)तनुश्री लखन सोळसे वय ०५ वर्षे रा. समतानगर, नाशिक, २) संगीता विलास अस्वले वय ४० वर्षे रा. वनसगाव ता. निफाड ३) पंजाबी रमेश जगताप वय ३८ वर्षे रा.नाशिक, ४) रतन जमदाडे वय ४५ रा. वैजापुर ५) काजल लखन सोळसे वय ३२ वर्षे रा. नाशिक, ६) रजनी गौतम तपासे वय ३२ वर्षे रा. नाशिक, ७) हौसाबाई आनंदा सिरसाठ वय ७० रा. ८) झुंबर काशिनाथ गांगुर्डे वय ५८ वर्षे रा. नाशिक ९) अमोल झुंबर गांगुर्डे वय १८ वर्षे रा. नाशिक १०) सारिका झुंबर गांगुर्डे वय ४० वर्षे रा. नाशिक ११) मिलींद हिरामन पगारे वय ५० वर्षे रा. कोकणगाव ता. निफाड १२) दीपक प्रभाकर केकाने वय ४७ वर्षे रा. नाशिक यासह यामध्ये एकुण २३ व्यक्ती या जखमी झाले होते . घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली प्रसंगी सर्वप्रथम जखमींना वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते प्राथमिक उपचार करून गंभीर जखमींना अधिक उपचाराकरिता छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते,तर या प्रकरणात सायंकाळी ट्रॅव्हल्स मधील प्रवासी कमलेश दगू म्हस्के यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भादवी कलम 304 ,2, 308 ,337, 338, 34, 427, नुसार वैजापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ब्रिजेश कुमार चंदेल ट्रक चालक व आरटीओ अधिकारी प्रदीप छबुराव राठोड, नितीनकुमार सिद्धार्थ बोणारकर अशी गुन्हा दाखल झालेल्या तीनही आरोपींची नावे आहे, तर या प्रकरणात फिर्यादीने अपघात झाल्यावर आरटीओच्या गाडीचे फोटो काढले होते ज्यावरून आरोपी निष्पन्न झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी दिली आहे यासोबतच एका चिमुकल्याने देखील जे स्टेटमेंट दिले होते त्यानुसार आरटीओने ट्रकला कारवाई करिता रस्त्याच्या कडेला लावले त्यानंतरच टेम्पो ट्रॅव्हल्स हा भरधाव वेगाने सदरील ट्रकला धडकला ज्यामुळे हा अपघात झाल्याचे सदरील चिमुकल्याने माहिती दिली होती.

त्यानुसार आता कमलेश दगू म्हस्के यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या तीनही आरोपींवर वैजापूर पोलिसात विविध कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर या प्रकरणाचा अधिक तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ हे करीत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!