कायगांव टोका येथील उपोषणार्थी शिवबा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष देविदास पाठे यांची यांची प्रकृती खालावल्याने छत्रपती संभाजीनगर येथील घाटी दवाखान्यात दाखल.. उपचार सुरू

कायगांव टोका येथील उपोषणार्थी शिवबा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष देविदास पाठे यांची यांची प्रकृती खालावल्याने छत्रपती संभाजीनगर येथील घाटी दवाखान्यात दाखल.. उपचार सुरू


गंगापूर (प्रतिनिधी)मराठा आरक्षण लवकर मिळावे यासाठी औरंगाबाद पुणे महामार्गावरील हुतात्मा काकासाहेब शिंदे यांच्या स्मारकाजवळ आमरण उपोषणाला बसलेले उपोषणार्थी शिवबा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष देविदास पाठे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपोषणाचा आजचा आठवा दिवस आहे.


जालना येथील अंतरवाली सराटी या गावात आरक्षणासाठी शांततेत चालू असलेला मराठा समाजाच्या आंदोलनावेळी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला असून, अश्रूधाराचे नळकांडे फोडण्यात आले. त्यामुळे पोलिसांचा तसेच प्रशासनाचा जाहीर निषेध म्हणून सकल मराठा समाजच्या वतीने गावोगावी उपोषणाला बसलेले आहे
छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्गावरील कायगांव टोका येथील गोदावरी नदीच्या पुलाजवळ हुतात्मा काकासाहेब शिंदे यांच्या स्मृती स्थळाजवळ ३ सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास तालुक्यातील शिवबा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष देविदास पाठे यांनी अंतरवाली सराटी येथील आंदोलकांच्या समर्थनार्थ मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी होवून बेमुदत उपोषणास सुरुवात केली होती आज आठव्या दिवशी त्यांची प्रकृती चिंताजनक झाली असता कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी त्यांना १०८ रुग्णवाहिकेमधून १० सप्टेंबर रोजी दुपारी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्यांच्या सोबत शेतकरी नेते भाऊसाहेब शेळके व मराठा बांधव काळजी घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!