हपापाचा माल गपापा. गंगापूर तहसील कार्यालयातील प्रकार जप्त वाळुवर ठेकेदाराने मारला डल्ला.या मागील सुत्रधार कोण 


गंगापूर (प्रतिनिधी)
गंगापूर तहसील कार्यालयात जप्त केलेल्या वाळुच्या साठ्यातुन भुमी अभिलेख कार्यालयाच्या सुरू असलेल्या दुरुस्ती कामांसाठी विनापरवानगी वाळूचा वापर होत असल्याने यामागे काय गौडबंगाल आहे.या प्रकरणी ठेकेदारावर कोण कारवाई करणार याला जबाबदार कोण, कोणाच्या सांगण्यावरून वाळू उचलली असे अनेक प्रश्न सर्वसामान्य मधून उपस्थित करण्यात येत आहे.
तहसील कार्यालयातील जप्त वाळु साठ्यातुन कोणाच्या आदेशाने वाळू पसार केली याची चौकशी करून संबंधितांकडून याची वसुली करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
गंगापूर तहसीलदार सतीश सोनी यांना जामगाव येथे अवैध वाळू साठा असल्याची माहिती मिळाली होती तहसीलदार सोनी यांच्या आदेशाने तहसीलच्या पथकाने जामगाव येथे अवैध रित्या केलेला ६० ते ६५ ब्रास वाळू साठा दोन ते तीन महीण्या पुर्वी जप्त केला होता मात्र या वाळू साठ्याचा अद्याप पर्यंत लिलाव करण्यात आला नसल्याने गंगापूर येथील तहसील कार्यालयाच्या आवारात असलेल्या वाळू साठ्यातुन भुमी अभिलेख कार्यालयातील दुरुस्तीच्या कामासाठी जवळपास दोन ते तीन ब्रास वाळू वापरली असुन चालु कामालाही वाळुचा सर्रास वापर कोणाच्या सांगण्यावरून सुरू आहे. भुमी अभिलेख कार्यालयातील दुरुस्तीसाठी पालकमंत्री यांनी निधी दिला असून भुमी अभिलेख कार्यालयातील पालकमंत्र्यांच्या जवळील कर्मचाऱ्याचे हे काम असल्यामुळे हे बिनदिक्कत सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.ही वाळु पसार कोणाच्या आदेशाने करण्यात आली या मागे कोणती शक्ती आहे याची चौकशी करून संबंधितांकडून वसूली करण्याची मागणी सर्व सामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!