लासुरस्टेशन येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या जागेतील अतिक्रमण त्वरित काढा नसता शिवप्रेमींचा आमरण उपोषणाचा इशारा

गंगापूर (प्रतिनिधी) लासुर स्टेशन येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारक परिसरात मोठ्या प्रमाणत अतिक्रमण करण्यात आले असून मुळ स्मारकाची जागा हि कमी दिसत आहे त्यामुळे स्मारकाच्या सुशोभीकरनाच्या कामात अडथळा निर्माण होतोय ग्रामपंचायतच्या रेकॉर्ड नुसार १०० × १२० अशी आहे पण सद्य स्थिती मध्ये ही जागा कमी भरत आहे या झालेल्या अतिक्रमणामुळे समस्त शिवप्रेमीच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत येत्या चार दिवसात करण्यात आलेले अतिक्रमण हटवून रेकॉर्ड नुसार सर्व जागा मोकळी करून द्यावी अशी मागणी सावंगी ग्रुप ग्राम ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. नसता समस्त शिवप्रेमींच्या वतीने लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करण्यात येईल निवेदन देतेवेळी नितीन कांजुणे,अमोल शिरसाठ, मनोज सुराशे,विजय भाले,अजय साखळे, अशोक खिल्लारे, मोहसीन बागवान, संदीप आमराव,गणेश आघाडे, विजय जगताप,आदेश रणयेवले, प्रतीक खंडेलवाल, मयुर शिरसाठ, विनोद शिरसाठ, आकाश भगुरे, सचिन डिके,अमोल काकडे, नदीम शेख आदी उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!