गंगापूर शहरात भारतीय जनसंघाचे संस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी

गंगापूर शहरात भारतीय जनसंघाचे संस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी
गंगापूर (प्रतिनिधी)

गंगापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामधील आमदार प्रशांत बंब यांच्या संपर्क कार्यालयात २५ सप्टेंबर सोमवार रोजी भारतीय जनसंघाचे संस्थापक पंडित दिनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी भाजपा जिल्हा कार्यकारणी सदस्य रामेश्वर मालुसरे यांनी यावेळी सांगितले की,आर्थिक विकासाचे प्रयत्न समाजाच्या पंक्तीला उभे असलेल्या शेवटच्या व्यक्तीपासून सुरू झाली पाहिजेत प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कुवत, आवड आणि कार्यक्षमतेनुसार काम मिळाले पाहिजे जेणेकरून त्यांच्या प्राथमिक गरजांची पूर्तता करणे सोपे होईल अशी पंडित दीनदयाल यांची अंत्योदयामागची भूमिका होती असे सांगितले यावेळी कृष्णकांत व्यवहारे, भाजपचे प्रशांत मुळे,ओबीसी नेते सोमनाथ शिंदे,महाराष्ट्र नाभिक महामंडळ तालुका उपाध्यक्ष अमोल शिंदे,रुग्ण कल्याण समितीचे अतुल रासकर,विठ्ठल भटकर, चैतन्य भांबरे,नागेश भारसाकळे, बाबासाहेब धोत्रे, संजय अभंग, भागीनाथ साळुंके, दिनेश राऊत आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!