लाठीचार्जवरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चक्क मागितली माफी !

लाठीचार्जवरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चक्क मागितली माफी !

मुंबई (प्रतिनिधी( जालन्यातील आंतरवली सराटी येथील मराठा आंदोलकांवरील लाठीमाराची घटना अंत्यत दुर्दैवी आहे. त्या घटनेचे सरकार समर्थन करत नाही. या लाठीमारीत अनेक आंदोलक जखमी झाले. या लाठीहल्ल्यामुळे आंदोलकांना अनेक यातना सहन कराव्या लागल्या. याबद्दल सरकारच्या वतीने गृहमंत्री म्हणून दिलगीरी व्यक्त करत देवेंद्र फडणवीसांनी जाहीरपणे माफी मागितली. दरम्यान, फडणवीसांनी या घटनेचे राजकारण करणाऱ्या विरोधकांवर सडकून टीका केली. 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अथितीगृहावर सोमवारी मराठा आरक्षणासंदर्भात महत्वाची बैठक झाली. तीन तासांहून अधिकवेळ झालेल्या या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मराठा आंदोलकांना झालेल्या त्रासाबद्दल जाहीरपणे दिलगिरी व्यक्त केली. ते म्हणाले, “आंतरवाली सराटीत आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचे सरकार समर्थन करत नाही. या लाठीमारीत अनेक आंदोलक जखमी झाले. आंदोलकांना अनेक यातना सहन करावा लागला. याबद्दल सरकारच्या वतीने मी आंदोलकांची माफी मागतो.”
मराठा आंदोलकांची माफी मागितल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आपला मोर्चा विरोधकांकडे वळवला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह विरोधकांवर तीव्र शब्दात टीका केली. “पोलिसांनी केलेल्या हल्ल्यानंतर अनेक नेत्यांनी घटनास्थळी जात आंदोलकांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी लाठीहल्ल्याचे आदेश मंत्रालयातून आल्याचे चित्र रंगवण्याचा प्रयत्न केला. त्यांना माहीत असेल की घटनास्थळावरील स्थिती पाहून असे निर्णय जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक घेत असतात,” असे सांगत फडणवीसांनी नाव न घेता पवारांना लक्ष्य केले.

फडणवीसांनी पुन्हा गोवारी आणि मावळ प्रकरण उकरून काढत तत्कालीन काँग्रेस, राष्ट्रवादी सरकारवर निशाणा साधला. फडणवीस म्हणाले, आताच्या घटनेत मंत्रालयातून आदेश दिल्याचे विरोधत बोलत असतील तर गोवारी लाठीचार्जमध्ये शेकडो निष्पाप लोकांचा मृत्यू झाला, त्याचे आदेश कुणी दिले होते. मावळातील गोळीबारात दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता, त्याचे आदेशही मंत्रालयातूनच आले होते का? त्यामुळे जालन्यातील लाठीचार्जच्या घटनेवरून कुणीही राजकारण करत असेल तर त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका, असेही आवाहन फडणवीसांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!