कवी जमील पठाण, गोकूळ लांडे व सविता पवार यांना राज्यस्तरीय “क्रांती योद्धा ” पुरस्कार जाहीर

गंगापूर (प्रतिनिधी): महाराष्ट्र नवक्रांती शिक्षक व पदवीधर संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे दरवर्षीप्रमाणे दिले जाणारे राज्यस्तरीय “क्रांती योध्दा” पुरस्कार या वर्षी गंगापूर तालुक्यातील अमळनेर येथील माजी राष्ट्रपती भारतरत्न स्वर्गीय डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांचे जीवनचरित्र काव्यातून साकारणारे कवी तथा दैनिक सकाळ चे पत्रकार जमील इस्माईल पठाण, व दैनिक मराठवाडा साथीचे भिवधानोरा येथील पत्रकार गोकुळ मधुकर लांडे यांना देण्यात येणार आहे.
रविवारी २९ आक्टोंबर रोजी अकोला येथे “आदर्श पत्रकार” पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र नवक्रांती शिक्षक व पदवीधर संघटना, महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष प्रा संजय तुपे यांनी २२ आक्टोंबर रोजी भेंडाळा येथे निवड पत्र देऊन ही घोषणा केली.
जमील पठाण यांनी सामाजिक क्षेत्रात , साहित्य क्षेत्रात आणि पत्रकारितेत शेतकरी विषयी केलेल्या उल्लेखनीय लिखाण कामगिरीबद्दल त्यांना यंदाचा पुरस्कार दिल्याचे प्रा. तुपे यांनी जाहीर केले.

तसेच गोकुळ लांडे यांनी पत्रकारितेत केलेल्या प्रशंसनीय कार्याबद्दल त्यांची राज्यस्तरीय “क्रांतीयोध्दा पुरस्कार २०२३ करिता निवड झाली असून त्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.
तसेच गंगापूर तालुक्यातील साईराम इंग्लिश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज रांजणगाव (शें पू) च्या प्राचार्या सविता भगवान पवार यांना ही राज्यस्तरीय “क्रांतीयोध्दा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
साहित्य क्षेत्र,पत्रकारिता क्षेत्र आणि सामाजिक क्षेत्रातील भूषणावह ठरणाऱ्या आपल्या दैदिप्यमान कार्याचा उचित गौरव म्हणून महाराष्ट्र नवक्रांती शिक्षक व पदवीधर संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ” जमील पठाण,गोकुळ लांडे,सविता पवार यांची राज्यस्तरिय क्रांती योध्दा पुरस्कार २०२३ साठी निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार २९ ऑक्टोबर २०२३ रविवार रोजी तेल्हारा जि. अकोला येथे संस्थापक अध्यक्ष प्रा उमेश म्हसाये, राज्याध्यक्षा पद्मावती टीकार,राज्य उपाध्यक्ष प्रा संजय तुपे व आदी मान्यवरांच्या हस्ते सन्मानपुर्वक प्रदान करण्यात येणार आहे.या पुरस्काराच्या निवडीबद्दल पत्रकार जमील पठाण, प्राचार्या सविता पवार ,पत्रकार गोकुळ लांडे यांचे सर्व स्थरातून कौतुक अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!