जुन्या वादातून शहरटाकळी मध्ये लक्ष्मी देवीच्या यात्रेत खून.एकास अटक


शेवगाव (प्रतिनिधी) 
शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी येथे लक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त छबिना मिरवणुकीत जुन्या भांडणाच्या वादातून एकास जबर मारहाण  करण्यात आली या मारहाणीत जखमी झालेल्या युवकाचा शेवगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने तालुका हादरला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी येथे  गुरुवारी २ मे रोजी रात्री साडेदहा वाजता गावातील लक्ष्मीदेवी आईच्या यात्रेनिमित्त छबिना मिरवणुकीमध्ये जुन्या किरकोळ वादावरून सात ते आठ जणांनी सशस्त्र हल्ला करून अक्षय आपशेटे(२४) रा. शहरटाकळी यास गंभीर जखमी केले रात्री साडेदहा ते अकराच्या दरम्यान ही घटना घडली असून जखमी युवकाला उपचारासाठी शेवगाव ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले असता रात्री उशिरा त्याचा उपचारादरम्यान जास्त रक्तस्त्राव झाल्याने मृत्यू झाला आहे.
शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये भाऊ संकेत संजय आपशेटे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की आरोपी   अजय दावीत कोल्हे , किरण उत्तम चव्हाण , पंकज लक्ष्मण कोल्हे ,  अविनाश साईनाथ पवार, विकास संजय कोल्हे  व यांच्याबरोबर गावातील इतर तीन ते चार इसमाने गुरूवारी दोन तारखेला रात्री साडेदहा वाजता लक्ष्मी देवी मंदिराजवळ  स्ट्रीट लाईट मध्ये घातक शास्त्रांनी अक्षय संजय आपशेटे वय 24  यास लाथा बुक्क्यांनी आणि घातक शास्त्राने जबर मारहाण करून ठार मारले या प्रकरणी शेवगाव पोलिस स्टेशनमध्ये वरील आरोपी विरोधात भारतीय दंड संहिता 1860 प्रमाणे  भा.द.वि.  कलम 302, 143, 147, 148, 149, 323 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्यांमध्ये एक आरोपीस अटक करण्यात आली असून इतर आरोपी फरार झालेले आहेत. गुन्ह्याचा तपास शेवगावचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. लवकरच फरार आरोपींच्या मुसक्या आवळल्या जातील असे शेवगाव पोलिसांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार 

जोपर्यंत संबंधित आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृताच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता परंतु पोलीस प्रशासनाने चार दिवसांमध्ये त्वरित आरोपींना पकडण्याची हमी दिल्याने व गावातील इतर जेष्ठ मंडळींनी मध्यस्थी केल्याने अंत्यविधी करण्यात आला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!