विनापरवाना बर्फी उत्पादन करणाऱ्या आस्थापनेवर अन्न औषध प्रशासन व गुन्हे शाखेच्या छाप्यात १२ लाखाचा मुद्देमाल जप्त.


छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी)अन्न औषध प्रशासन व गुन्हे शाखेने
मिटमिटा येथे विनापरवाना बर्फी उत्पादन करणाऱ्या आस्थापनेवर छापा मारुन ५९८ किलो बर्फी सह १२ लाख मुद्देमाल जप्त

अन्न औषध प्रशासन व गुन्हे शाखा छत्रपती संभाजीनगर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार २० आक्टोंबर रोजी विनापरवाना बर्फी उत्पादन करणाऱ्या आस्थापनेवर छापा टाकला. यामध्ये किरण बच्चनलाल सिंग हा उस्मानिया कॉलनी, मिटमिटा येथे विनापरवाना बर्फी उत्पादन करीत असल्याचे आढळले असून या ठिकाणी उत्पादित केलेल्या बर्फी या अन्न पदार्थाचा नमुना घेऊन शिल्लक साठा ५९८ किलो, अंदाजे किंमत ८९ हजार ७०० रुपये जप्त करण्यात आला आहे.
या ठिकाणी बर्फी उत्पादन करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अन्न पदार्थांचे नमुने घेऊन उर्वरित साठा स्किम्ड मिल्क पावडर २०४८ किलो अंदाजे किंमत ९ लाख ८३ हजार‌ ४० रुपये, रिफाइंड सोयाबीन ऑईल १००३ लिटर किंमत १ लाख २१ हजार ६९८ रुपये ,वनस्पती १९८ किलो किंमत २८ हजार ४७४
रवा २९८ किलो किंमत ११ लाख ९२० रुपये ,साखर १३४८ किंमत ५२ हजार ५७२ रुपये असा एकुण १२ लाख ८ हजार ४०४ रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला असून
आस्थापनेस व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. ही
कारवाई अन्न व औषध प्रशासन कार्यालयाचे सहायक आयुक्त (अन्न) अजित मैत्रे यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी सुलक्षणा जाधवर व ज्योत्स्ना जाधव यांनी पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!