महिलांनी राजकारणात नवीन योजना अमलात आणून कार्यरत राहावे- शिल्पा परदेशी

गंगापूर (प्रतिनिधी) तालुक्यातील काटेपिंपळगांव येथील भाजपाच्या सरचिटणीस मनिषा व्यवाहारे यांच्या येथे मकर संक्राती निमित्त हळदी कुंकवाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
काटेपिंपळगांव येथे २६ जानेवारी रोजी आयोजित हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला वैजापूर नगरअध्यक्षा शिल्पाताई दिनेश परदेशी , भाजपा महिला मोर्चा जि. अध्यक्षा जयमालाताई वाघ, माजी नगरसेविका ऊर्मीला मारुती खैरे , भाजपा महिला मोर्चा ता. अध्यक्षा गंगापूर तथा ग्रा.पं. सदस्य लासुर स्टेशन शिलाताई भगवान गाडे, वाहेगांव सरपंच रेणूका सुदाम भडके , प्रियंका अनिरुध्द टेमकर,५३ गांव भाजपा महिला मोर्चा ता. अध्यक्षा गिताजंली कृष्णा धोत्रे , भाजपा महिला ओ.बी.सी.वृषाली कैलास गायकवाड, भाजपा जिल्हा सरचीटनीस ज्योतीताई गायकवाड, गुरुकुल इंग्लिश स्कूलच्या प्रज्ञा प्रशांत मुळे,शितल रविंद्र वालतुरे नेवरगांव, व्हा. चेअरमन वि.का.सो. मिराबाई बाबासाहेब जगताप ,रजंना यशंवत व्यवहारे,चंदारानी लक्ष्मीकांत व्यवहारे आदींची प्रमुख उपस्थिती होती .
या कार्यक्रमाचत बचत गट व विश्वकर्मा योजना तसेच अनेक योजनांची माहिती देत मनीषा कृष्णकांत व्यवहारे यांनी प्रस्ताविक केले. भाजपा जिल्हाध्यक्ष महिला मोर्चा जयमालाताई वाघ यांनी बचत गटाविषयी माहिती दिली
उर्मिला मारुती खैरे यांनी महिलांनी राजकारण व समाजकारण याविषयी माहिती दिली. शीलाताई भगवान गाडे महिलांनी राजकारणात येऊन गोरगरिबांची सेवा करावी प्रत्येक लाभार्थ्यांना अनेक योजनेचा कसा लाभ देण्यात येईल या विषयी माहिती दिली.शिल्पाताई परदेशी नगराध्यक्ष वैजापूर यांनी महिलांनी राजकारणात नवीन योजना अमलात आणून कार्यरत राहावे जेणेकरून महिला संघटन मजबूत होईल याविषयी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला महिला बचत गट व गावातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!