धक्कादायक..मोबाईलवर मॅसेज करणे आईला पडले महागात मुलाने आईलाच संपवले…आईने मोबाईलवरुन मॅसेज केला, संतापलेल्या अल्पवयीन मुलाने जे केले त्याने वसई हादरली !

धक्कादायक..मोबाईलवर मॅसेज करणे आईला पडले महागात मुलाने आईलाच संपवले
आईने कुणाला मोबाईलवरुन मॅसेज केला, संतापलेल्या अल्पवयीन मुलाने जे केले त्याने वसई हादरली !

मुंबई (प्रतिनिधी) वसईत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. क्षुल्लक कारणातून अल्पवयीन मुलाने आईचीच हत्या केल्याची धक्कादायक घटना वसई टाऊनशीपच्या पारोळे भागात घडली. रविवारी रात्री ही भयंकर घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सोनाली गोगरा असे मृत महिलेचे नाव आहे. घटना घडली तेव्हा घरी आई आणि मुलगा दोघेच होते. याबाबात मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यास आला आहे. मात्र अद्याप अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आली नाही. पोलिसांनी हत्येत वापरलेले हत्यारही जप्त केले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री अल्पवयीन मुलगा जेवत असताना आई मोबाईलवरुन कुणाला तरी मॅसेज करत होती. आईला मॅसेज करताना पाहून मुलाचा राग अनावर झाला त्यानंतर त्याने कुऱ्हाड घेतली आणि आईवर वार केले. यात महिला गंभीर जखमी झाली. तिला तात्काळ भिवंडीतील इंदिरा गांधी मेमोरियल रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
आई व मुलात नेहमी वाद व्हायचे
अल्पवयीन मुलाला आईच्या चारित्र्यावर संशय होता यामुळे आईमुलात नेहमी वाद व्हायचे. घटनेच्या दिवशीही असाच वाद झाला. त्या दिवशी घरचे सदस्यही बाहेर होते. क्षुल्लक कारणातून मुलाने जे केले त्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी मांडवी पोलिसांनी आरोपी मुलाविरोधात भादवी कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!