जुन्या व तांत्रिक दृष्ट्या खराब बस भंगारात काढा राष्ट्रवादी काँग्रेसने केली मागणी *
गंगापूर (प्रतिनिधी) गंगापूर आगारामधून जुन्या व वयोमर्यादा संपलेल्या बसला भंगारात काढण्याची मागणी गंगापूर राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे
आगारप्रमुख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , महाराष्ट्र सरकारने मागील काही महिन्यात घेतलेल्या निर्णयामुळे ७५ वर्ष वरील सर्व नागरिकांना बस प्रवास मोफत देण्यात आला आहे, तसेच महिलांना प्रवासाच्या तिकिटात 50% संबलत देण्यात आली आहे. या मुळे गंगापूर शहरांमधून महिलांचे व ७५ वर्षावरील नागरिकांची बस मधून प्रवास करण्याची संख्या खूप वाढली आहे. तरी नागरिकांचे हित लक्षात घेता व जीवितहानी टाळण्यास खराब बस लवकरात लवकर भंगारात काढण्यात याव्यात बस खराब असल्यामुळे एकही नागरिकाची जीवितहनी झाली, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे या निवेदनावर राष्ट्रवादीचे कैलास खाजेकर, अनंत कुमावत आदित्य सुधामे ,हसन शेख , पृथ्वीराज तोगे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!