कै. विनायकराव पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित विभागीय क्रीडा स्पर्धांचे श्री मुक्तानंद महाविद्यालय, गंगापूर येथे उत्साहात संपन्न


गंगापूर (प्रतिनिधी)मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै.विनायकराव पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित विभागीय क्रीडा स्पर्धांचे श्री मुक्तानंद महाविद्यालय, गंगापूर येथे उद्घाटन शिक्षणाधिकारी (मध्य) एम.के.देशमुख यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या केद्रीय कार्यकारिणीचे सदस्य् व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य् ॲड.लक्ष्मणराव मनाळ यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमास उपशिक्षणाधिकारी पाटील, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासकीय अधिकारी एफ.जी.माळी, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य संतोष अंबिलवादे, मनीष वर्मा, मोहसीन चाऊस, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सी.एस.पाटील, न्यू हायस्कूल, गंगापूरच्या शालेय समितीचे सदस्य् प्रभाकर सोनवणे, उपप्राचार्य डॉ.वैशाली बागुल, उपप्राचार्य डॉ.बी.टी.पवार, उपप्राचार्य प्रा.विशाल साबणे, पयवेक्षक डॉ.हरीराम सातपुते, .सरकटे, मंडळाचे शाळा निरीक्ष.गजानन पाटील,.कवडे , गठकळ , न्यू हायस्कूल, गंगापूरचे मुख्याध्यापक कवडे यादींची प्रमुख उपस्थिती होती.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. सी.एस.पाटील यांनी केले. आपले प्रास्ताविक करतांना प्राचार्य डॉ.पाटील म्हणाल्या की,
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ हे नाव मराठवाडा, महाराष्ट्रात, देशात नाही तर जगभर नावाजलेली शिक्षण संस्था म्हणून नावा रुपास आले आहे. मंडळाने फक्त ग्रामीण भागात नाही तर शहरी भागातही नेत्र दीपक असं कार्य केले आहे .01 सप्टेंबर 1958 रोजी म.शि. प्र.मंडळाची स्थापना झाली त्या स्थापने मागे एक उद्धार हेतू होता. माननीय यशवंतराव चव्हाण साहेब महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री त्यांचा उदाते हेतू हा होता की झोपडीतून, खेड्यापाड्यातून, तळागाळातून, पंचक्रोशीतला विद्यार्थी हा शिकला पाहिजे . शिक्षणापासून वंचित कोणीही वंचित राहून नये. शिक्षणाची ज्योत आपण लावूया आणि ही ज्योत घराघरात पेटली पाहिजे ते नुसती पेटली नाही पाहिजे पण प्रज्वलित झाली पाहिजे आणि ते अखंडपणे त्याचा प्रकाश सर्व जगभर पसरला पाहिजे हा हेतू मनात होता. तो आज आपल्याला छोटासा रोप वटवृक्ष झालेला दिसत आहे. आणि त्यांचं स्वप्न साकार होऊन कधीच त्या वटवृक्षाला पारंब्या आलेल्या आहेत. या मंडळाची स्थापना होऊन आज रोजी 65 वर्षे झाली या 65 वर्षांमध्ये अनेक जिल्ह्यांमधून मंडळाच्या शाळा महाविद्यालयाच्या शाखा आहेत .त्यामध्ये पहिल्या ठिकाणी नाव आपण छत्रपती संभाजीनगर पासून ते बीड, परभणी, धाराशिव, जालना या सर्व जिल्ह्यांमधून या शाळा व महाविद्यालय नावारूपाला येत आहेत आणि शाळा व महाविद्यालय असे एकूण 148 शाखा आहेत. 148 शाखांमधून एक लाखाच्या वर विद्यार्थी आज शिक्षण घेत आहेत आणि हे शिक्षण देताना आपण विद्यार्थ्यांना साक्षर करतोच आहोत ते आपले कर्तव्यच आहे पण साक्षर करताना विद्यार्थी हा सुसंस्कारित व्हावा सुशिक्षित व्हावा आणि समाजाचा एक बुलंद घटक व्हावा आणि तो समाजाला हवाहवासा वाटावा असं कार्य आपण केलं पाहिजे असे मंडळाचे अध्यक्ष, सरचिटणीस तथा आमदार सतीश चव्हाण, सदस्य संतोष अंबिलवादे व सर्व पदाधिकारी, सर्व सदस्य प्रशासकीय अधिकारी, उपप्रशासकीय अधिकारी, शालेय समिती सर्वांना त्यांच्या विचारधारेनेतून तीव्रतेने जाणवलं आणि असं लक्षात आलं की फक्त वर्गनिहाय शिक्षण नाही तर अनेकविध उपक्रम आपण राबवले पाहिजेत. आणि ह्या हेतूने महाविद्यालयात नाही तर शाळा सुद्धा अग्रेसर ठिकाणी आहेत सांघिकीपणा नीटनेटकेपणा होता आणि एक वळण लागतं आणि हा विद्यार्थी आयुष्याच्या समाज नावाच्या संघामध्ये परिपूर्णतेने उतरतो. आणि समाजाला काहीतरी देऊ इच्छितो व देतो. आणि तो पूर्णत्वाला नेतो समाजाचा स्वप्न महाविद्यालयाचा स्वप्न आणि शाळेचा स्वप्न साकार करतो. आणि अशा महाविद्यालयाच्या शाळांच्या विद्यार्थ्यांच्या निमित्ताने आपल्या मंडळाचे नाव खूप मोठं आज होत आहे, होणार आहे आणि ते सातत्याने चालू आहे. कै.विनायकरावजी पाटील स्मृती प्रित्यर्थ ज्या विभागीय क्रीडा स्पर्धा होतात त्या अखंडितपणे मागील वीस वर्षापासून चालू आहेत ही काय साधीसुधी बाब नाही.
आपण नेहमी म्हणतो “साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा” हे मी आता दोन ओळी ही अशी “अनेक मान्यवर येती, स्वप्न घेऊन येती, आठवणी देऊन जाती, आठवणी घेऊन जाती, आणि मिळतो आठवणींना उजाळा, आणि असा नयनरम्य महोत्सव, आणि होतो साजरा असा सोहळा” या क्षणी ही जी क्रीडा स्पर्धा चालू आहे आपली अनेक वर्षापासून ही फक्त महाविद्यालयात नाही तर तालुकास्तरीय पातळीवर महाविद्यालयामधून याचा सहभाग नोंदवला जातो. या क्रीडा स्पर्धा घेतल्या जातात आणि त्यामधला विजेता संघ उपविजेता संघ अशी 350 मुले आणि 350 मुली असा 700 ते 800 विद्यार्थ्यांचा सहभाग या स्पर्धेला असतो. आणि तो विभागीय क्रीडा स्पर्धेमधून आपल्याला पाहावयास मिळतो. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळा आहे त्या शाळामधील महिला खेळाडूंची सुद्धा निवड राष्ट्रीय पातळीवर होते ही अभिमानाची गोष्ट आहे. आणि आपला जो गंगापूरचा क्रीडा विभाग आहे, आपले विद्यार्थी विभागीय, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक गौरवपूर्ण काम केलेला आहे. आणि याची नोंद आपण नेहमीच घेत आलेलो आहोत. हे खेळाडू शासकीय नोकरीमध्ये पाच टक्के राखीव जागा आहे त्यामध्ये आपलं नाव उज्वल करत आहेत. अनेक ठिकाणी नोकरी सांभाळत आहेत याचाही आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. श्री मुक्तानंद महाविद्यालय गंगापूरला हा बहुमान मागच्या वर्षीपासून दुसऱ्यांदा सातत्याने मिळालेला आहे. मागील वर्षापासून आजपर्यंत श्री मुक्तानंद महाविद्यालय गंगापूर खूप मोठी घोडदौड करत आहे. नॅकचा ग्रेड असेल, मागच्या वर्षीच्या स्पर्धा असतील, मा. भानुदास चव्हाण प्रतिष्ठान, छत्रपती संभाजीनगर व श्री मुक्तानंद महाविद्यालय गंगापूर यांच्या संयुक्त विद्यमाने घेतलं गेलेले आरोग्य तपासणी शिबिर असेल ज्यामध्ये दोन हजार नागरिकांनी तपासणी केली. गुडघेदुखी, सांधेदुखी आणि ७० रुग्णाची निवड करून मोफत जे ऑपरेशन सैफी हॉस्पिटल मुंबई येथे करण्यात आले. ही महाविद्यालयाच्या दृष्टीने एक भरीव अशी सामाजिक बाब ठरली आहे. आणि याचे श्रेय आमदार सतीश भाऊ चव्हाण सरचिटणीस मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ यांना आहे. त्यांच्या निमित्ताने एक बुलंद असा आधार या तालुक्याला मिळत आहे. महाविद्यालयाच्या देवगिरी डिफेन्स् ॲकॅडमीत 36 मूल प्रवेशित आहेत. पोलीस भरती आर्मी भरती मध्ये सुद्धा आमच्या या महाविद्यालयाचा सहभाग आहे. जाधव आणि क्रीडा विभाग यामध्ये सातत्याने सक्रिय आहे. गंगापूर मध्ये हुबळी देशपांडे फाउंडेशन कर्नाटक राज्य आणि म.शि.प्र.मंडळात करार झाला आणि विद्यार्थ्यांना नोकरी मिळावी, जॉब मिळावा म्हणून मंडळ सातत्याने लक्ष देऊन आहे. आणि या विद्यार्थ्यांची फीसही संस्था भरत आहे. श्री मुक्तानंद महाविद्यालयातील परिवार प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यालयांचा पूर्ण महाविद्यालयातील परिवार हा सातत्याने झटत असतो की कुठलही कार्यक्रम हा आदर्शला नेलं पाहिजे. कसं चांगलं केलं पाहिजे तसं नीटनेटक झालं पाहिजे आपण झटत असतो आणि मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ आपल्या पाठीमागे खंबीर साथ देऊन उभं असतं. प्रशासकीय अधिकारी माळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी नॅकच्या काळात कर्मचारी पाठवून साथ दिली आणि हे महाविद्यालयातील कार्य अतिशय उत्कृष्ट झालं आणि आज हे महाविद्यालय ज्या ठिकाणी उभा आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आमचे सदस्य माजी आमदार ॲड लक्ष्मणराव मनाळ साहेब हे आधारस्तंभ आहेत. नुकत्याच महाविद्यालय मराठवाडा साहित्य् परिषदेचे 43 वे मराठवाडा साहित्य संमेलन अतिशय उत्कृष्टपणे व यशस्वीपणे पार पडले याचे श्रेय मंडळाचे अध्यक्ष प्रकाशदादा सोळंके, सरचिटणीस आमदार सतीश चव्हाण व सर्व केंद्रीय कार्यकारणी सदस्य, महाविद्यालय विकास समिती सदस्य यांना आहे. त्यांनी आम्हांला आम्हाला साथ दिली . न्यू हायस्कूल गंगापूरने या क्रीडा स्पर्धेसाठी अत्यंत वेगवेगळ्या स्तरावर आम्हाला श्रमदान केले आहे. गंगापूर नगरपालिकेनेही या क्रीडा स्पर्धेसाठी मोलाचे सहकार्य केले आहे. महाविद्यालयाच्या क्रीडा विभागातील सर्व शिक्षक व न्यू हायस्कूल, गंगापूर चे सर्व क्रीडा शिक्षक या स्पर्धेसाठी विशेष मेहनत घेतली आहेत. तसेच या क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडू व प्रशिक्षकांचे स्वागत करुन प्राचार्य डॉ.पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेचे उद्घाटक शिक्षणाधिकारी देशमुख म्हणाले की, 65 वर्षाच्या वाटचालीनंतर मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळामध्ये बदल आपल्याला दिसतो आहे. सुरुवातीचा जर काळ बघितला तर मला आठवते की मंडळाची साधनसामुग्री कमी होती परंतु पहिल्यापासून मंडळामध्ये जागांची कमी नाही. सगळीकडे मंडळाला खूप मोठ्या जागा या उपलब्ध झाल्या आणि त्याचा आता योग्य प्रकारे मंडळ वापर करत आहे. हळूहळू शाळा महाविद्यालयातून व्यावसायिक महाविद्यालयाकडे सुद्धा मंडळाने वाटचाल केलेली आहे. आणि आता मागच्या पाच वर्षांमध्ये जवळजवळ दहा ते बारा इंग्रजी माध्यमाच्या सीबीएससी बोर्डाच्या शाळा सुद्धा मंडळांनी सुरू केलेले आहे मंडळात 2000 पेक्षा अधिकचा कर्मचारी वर्ग कार्यरत आहे. आणि त्यातल्या चांगल्या माणसांना निवडून अनेक चांगल्या गोष्टी आपण करत आहोत. मी मनःपूर्वक मंडळाचे या ठिकाणी अभिनंदन करतो. आमचे जे औरंगाबाद शहरांमध्ये वेगवेगळे कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमांमध्ये आवर्जून विशेषता जेव्हा शारीरिक शिक्षणाचे कार्यक्रम असतात इथे तुमचे प्रशिक्षक उपस्थित आहेत खैरनार त्यांचा खूप मोठ्या प्रमाणावर फायदा आम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी घेत असतो. परंतु मला जे या ठिकाणी सांगायचं आहे की मंडळाचा जो विस्तार आहे. तो जास्तीत जास्त ग्रामीण भागामध्ये आहे. मागे आम्ही एक किशोरला कार्यक्रम घेतला होता. देशमुख यांनी विद्यार्थ्यांना तुम्हाला भविष्यात काय करायचे असे विचारले असता बहुतांश विद्यार्थ्यांनी आम्हांला सैन्यात भरती व्हायचे असे उत्तर दिले. तुम्हाला एक विचारायचे मला की तुमच्यापैकी डॉक्टर किती लोकांना व्हायचे असा एकदम सरळ हात वर करायचा ठीक आहे इंजिनियर किती जणांना व्हायचे ठीक आहे शेतकरी किती जणांना व्हायचे मग आता काय व्हायचं तुम्हाला एक जण जरा जोरात सांगा काय आवाज म्हणजे मला जे उत्तर पिशोरला ऐकायला मिळालं तेच उत्तर इथे पण ऐकायला मिळतंय हे मला वाटते आपल्या छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचे देशावरचा प्रेम असावं आणि म्हणून मी हा विषय काढला की तुमच्याकडे पाच-पन्नास प्रशिक्षक आहेत. यांचा चांगला वापर करा. या मुलांना मोठ्या प्रमाणामध्ये सैन्यामध्ये जाण्याची इच्छा आहे. किमान त्यांच्यासाठी तुमच्याकडे खूप मोठी मोठी मैदान आहे या मैदानाचा वापर चांगल्या करिअर अकॅडमी सुरू करण्यासाठी कृपा करून करा. आणि या विद्यार्थ्यांना काय आहेत ते ज्यांना त्यांना जे हवं आहे ते जर आपण पुरवलं तरच आपण खरे संस्था चालक आणि खरे शिक्षण प्रेमी आहोत. त्यामुळे त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मंडळ निश्चितच प्रयत्न कराल अशी अपेक्षा बाळगतो. स्पर्धेत सहभागी विद्यार्थी खेळाडूंना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय समारोप प्रसंगी ॲड.लक्ष्मणराव मनाळ म्हणाले की, स्पर्धेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करुन त्यांना शुभेच्छा दिल्या व खेळाडूंनी व्यवस्थितपणे या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवावा. सर्वांनी खिलाडूवृत्तीने या स्पर्धांचा आनंद घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
या प्रसंगी क्रीडा ज्योत प्रज्वलन करुन् व आकाशात हायड्रोजन फुगे सोडून या स्पर्धांना सुरुवात करण्यात आली.
या क्रीडा स्पर्धेत खो-खो-, कबड्डी, हॉलीबॉल, रस्सीखेच, लांबउडी या क्रीडा प्रकारांचा सहभाग होता. या स्पर्धेत चार जिल्हयातील एकूण 755 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला.
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष शेख सलीम शेख अहमद, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य् ॲड.लक्ष्मणराव मनाळ, डॉ.प्रकाश भांडवलदार, प्रदीप चव्हाण, मंडळाचे प्रशासकीय अधिकारी एफ.जी.माळी यांच्या हस्ते विजेते खेळाडू व संघांना स्मृतीचिन्ह् व पदक देण्यात आले. या कार्यक्रमास महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मोहसीन चाऊस, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सी.एस.पाटील, न्यू हायस्कूल, गंगापूरचे शालेय समिती सदस्य प्रभाकर सोनवणे, उपप्राचार्य डॉ.वैशाली बागुल, उपप्राचार्य डॉ.बी.टी.पवार, उपप्राचार्य प्रा.विशाल साबणे, पयवेक्षक डॉ.हरीराम सातपुते, सरकटे, मंडळाचे शाळा निरीक्षक गजानन पाटील, भाऊसाहेब कवडे , गठकळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
क्रीडा प्रकार – 100 मीटर धावणे
प्रथम क्रमांक -100 मीटर धावणे – मुले – सचिन मुंढे , न्यू हायस्कूल, अंबेवडगाव
व्दितीय क्रमांक -100 मीटर धावणे – मुले – किशोर अंभारे – न्यू हायस्कूल, आमठाणा
प्रथम क्रमांक -100 मीटर धावणे – मुली – कु.मनिषा पाडवी – न्यू हायस्कूल, चिकलठाणा
व्दितीय क्रमांक -100 मीटर धावणे – मुली – कु.कोमल चंदेल – न्यू हायस्कूल, गदाना
क्रीडा प्रकार – लांबउडी
प्रथम क्रमांक – लांबउडी – मुले – शुभम राठोड – न्यू हायस्कूल, जेहुर
व्दितीय क्रमांक – लांबउड्उी- मुले- – सचिन मुंढे – न्यू हायस्कूल, अंबेवडगाव
प्रथम क्रमांक – लांबउड्उी – मुली – जलोजी वसावे – न्यू हायस्कूल, चिकलठाणा
व्दितीय क्रमांक – लांबउड्उी- मुले- – कोमल चंदेल – न्यू हायस्कूल, गदाना
कब्बडी
प्रथम क्रमांक – मुले – न्यू हायस्कूल, गंगापूर
प्रथम क्रमांक – मुली – न्यू हायस्कूल, गदाना
खो-खो
प्रथम क्रमांक – मुले – न्यू हायस्कूल, गदाना
प्रथम क्रमांक – मुली – न्यू हायस्कूल, गदाना
*हॉलीबॉल*
प्रथम क्रमांक – मुले – न्यू हायस्कूल, लाडगाव
प्रथम क्रमांक – मुली – न्यू हायस्कूल, वैजापूर

*रस्सीखेच*
प्रथम क्रमांक – मुले – न्यू हायस्कूल, गंगापूर
प्रथम क्रमांक – मुली – न्यू हायस्कूल, अंबेवडगाव

सांघिक वेतेपद – मुले – न्यू हायस्कूल, गंगापूर
सांघिक विजेतेपद – मुली – न्यू हायस्कूल, गदाना

या स्पर्धा यशस्वितेसाठी क्रीडा विभाग प्रमुख डॉ फेरोज सय्यद, प्रा.सचिन हजारे, आली बाकोदा, अरविंद खाजेकर तसेच इतर सर्वांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.संदीप गायकवाड यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. फिरोज सय्यद यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!