देवगिरी महाविद्यालयाच्या मुलांच्या संघाने बॉस्केटबॉल राज्यस्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांक

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) देवगिरी महाविद्यालयाच्या १७ वर्षाखालील मुलांच्या संघाने बॉस्केटबॉल राज्यस्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावून घवघवीत यश प्राप्त केले

क्रीडा युवा सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मुंबई याच्या संयुक्तने विद्यमाने आंतर शालेय सतरा वर्षांखालील राज्यस्तरीय बॉस्केटबॉल स्पर्धेत देवगिरी महाविद्यालयातील मुलांच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला या विजयीसंघात जय निकम, हर्षवर्धन पाटील, ऋषभ कपुर, अनिकेत सांगळे, तनिष देशमुख, स्वानंद कुलकर्णी, आदित्य खांडेकर, सुरेश शिंदे, महेश बोमकांती, सुदर्शन जाधव, प्रणव जाधव हर्ष जयस्वाल यांचा समावेश होता.
या संघाच्या घवघवीत यशाबद्दल मराठवाडा प्रसारक मंडळाचे सरचिटणीस आमदार सतीश चव्हाण, स्थानिक नियमक मंडळाचे सदस्य पंडीतराव हर्षे, प्राचार्य डॉ. प्रोफेसर अशोक तेजनकर, उपप्राचार्य नंदकिशोर गायकवाड,, उपप्राचार्य सुरेश लिपाने, उपप्राचार्य विजय नलावडे, आदींसह देवगिरी परिवाराने खेळाडूंचे अभिनंदन केले, या स्पर्धेत यश प्राप्त खेळाडूंना कनिष्ठ क्रीडा विभाग प्रमुख प्रा. राकेश खैरनार, डॉ शेखर शिरसाठ, प्रा. शुभम गवळी, प्रा. अमोल पगारे, प्रा मंगल शिदें, प्रा. कृष्णा दाभाडे, प्रा अविनाश वाडे, शेख शफीक यांचे मागदर्शन लाभले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!