अमळनेर येथे श्रीमत भागवत कथा २९ ऑगस्टपासून गोवत्स भागवताचार्य राधाकृष्णाजी महाराजांच्या वाणीतुन ऐका

अमळनेर येथे श्रीमत भागवत कथा २९ ऑगस्टपासून गोवत्स भागवताचार्य राधाकृष्णाजी महाराजांच्या वाणीतुन ऐका


गंगापूर, ता.4 (प्रतिनिधी): वैकुंठवासी ह.भ.प कन्हैयालालजी मुंदडा महाराज यांच्या १४ व्या पुण्यस्मरणा निमित्ताने गंगापूर तालुक्यातील अमळनेर येथे २९ ऑगस्ट २०२३ पासून ते ५ सप्टेंबर २०२३ दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह शताब्दी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने गोवत्स भागवताचार्य श्री राधाकृष्णाजी महाराज यांच्या मुखविंदातून श्रीमत भागवत कथा ज्ञानयज्ञ व नामसंकीर्तन सोहळा होत आहे.त्या अनुषंगाने नियोजित अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथा स्थळी शुक्रवारी ४ ऑगस्ट रोजी सकाळी साडे दहा वाजता श्री क्षेत्र देवगडचे मठाधिपती गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांनी
प्रथम गाईचे पूजन करून विधिवत धर्म ध्वजारोहण केले.
या वेळी उपस्थित भाविक गावकरी मंडळींना मार्गदर्शन करतांना ते म्हणाले की,गावोगावी पायपीट करत भक्ती मार्गाने सर्वांना प्रेरित करणाऱ्या वै.भक्तराज ह.भ.प कन्हैयालालजी मुंदडा महाराज यांनी भागवत सप्ताह सुरू केला.त्यातलाच अमळनेर येथील १०० वर्षांपासून अखंडीत साजरा होत आहे. मुंदडा महाराज यांना आज १४ वर्षे आपल्यातून जाऊन झाले आहेत.त्यांच्या पश्चात समस्त गावकऱ्यांनी तो अखंडपणे चालू ठेवला आहे.व पुढे ही चालू राहील.
यासाठी अमळनेर, कायगाव, लखमापूर, गणेशवाडी व पंचक्रोशीतील लोकांनी एक दिलाने काम करून हा भव्य दिव्य कार्यक्रम यशस्वी करावा.असे आवाहन देवगड संस्थान चे प्रमुख महंत भास्करगिरी महाराज यांनी केले.यावेळी प्रामुख्याने राष्ट्रीय धर्माचार्य ह.भ.प डॉ. जनार्धन मेटे महाराज, ह.भ.प अन्साराम महाराज मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

धर्म ध्वजारोहण प्रसंगी गावात सडा ,रांगोळी काढून गाव सजविण्यात आला होता.कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी सहकारी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक रामेश्वर मुंदडा , सुरेश मुनोत,महावीर पाटनी, भरत पाटनी,बाबूशेठ धूत, नंदकुमार गांधीले,ह.भ.प नामदेव मिसाळ महाराज, सुरेश नेमाने,पंचायत समितीचे माजी उपसभापती सुमित मुंदडा ,मुक्तेश्वर शुगर मिल्स चे संचालक रामचंद्र पाटील निरपळ, मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण गाढे, मुख्य शेतकी अधिकारी,नंदकुमार कुंजर,ताराचंद शिंदे, विलास सूर्यवंशी,वसंत खताळ,कृष्णकांत व्यवहारे,सभापती भाऊसाहेब पदार,जेष्ठ पत्रकार राजेंद्र व्यास ,बंडू गोसावी आदी गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!