पुरुषोत्तम मास निमित्त श्रीक्षेत्र देवगड येथे श्रीमद भागवत कथा सोहळयास भक्तिमय वातावरणात प्रारंभ …. जीवनात श्रवण करा-स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज

पुरुषोत्तम मास निमित्त श्रीक्षेत्र देवगड येथे श्रीमद भागवत कथा सोहळयास भक्तिमय वातावरणात प्रारंभ
….राधे राधे च्या जयघोषाने देवगडनगरी दुमदुमली….
अंतकरणात भक्ती ज्ञान वैराग्य वाढवणारी श्रीमद भागवत कथा
जीवनात श्रवण करा-स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज

नेवासा(प्रतिनिधी)नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथे श्री समर्थ सद्गुरु किसनगिरीबाबा बालसंन्यासी यांच्या कृपा आशिर्वादाने त्रैवार्षिक पुरुषोत्तम मासानिमित्त श्रीमद भागवत कथा तथा श्री दत्त लक्ष्मीनारायण याग सोहळयास रविवार दि.२३ जुलै पासून गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज यांच्या हस्ते ग्रंथपूजन व भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.भागवत कथेच्या प्रसंगी “राधे राधे” च्या नाम चिंतनाने व जयघोषाने देवगडनगरी दुमदुमली होती.
अंतकरणात भक्ती ज्ञान वैराग्य वाढवणारी श्रीमद भागवत कथा
जीवनात श्रवण करा असे आवाहन स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांनी यावेळी बोलतांना केले.

भागवत कथेच्या शुभारंभ प्रसंगी देवगड येथील गुरुदेव दत्त पिठाचे प्रमुख महंत गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज यांच्या हस्ते व भागवताचार्य स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या उपस्थितीत भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या मूर्तीची व श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या प्रतिमेचे पूजन वेदमंत्राच्या जयघोषात करण्यात आले.यावेळी झालेल्या धार्मिक कार्यक्रमाचे

पौरोहित्य भेंडा येथील वेदशास्त्र संपन्न पुरोहित आचार्य गणेशदेवा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रम्हवृंद मंडळींनी केले.
श्रीमद भागवत कथा सोहळयाच्या शुभारंभ प्रसंगी बोलतांना स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज म्हणाले की श्रीमद भागवत कथा ही मृत्यूला ही मंगल बनविते तर कथेच्या श्रवणाने मनुष्याच्या ज्ञान व वैराग्यात वाढ होते,पितृदोष घालवता येतो, कथा आहे,अस्थिर मनाला स्थिर करण्याचे व जीवाचे दुःख घालवण्याचे सामर्थ्य भागवत कथा श्रवणाने प्राप्त होते असा संदेश देऊन ते म्हणाले की अधिक मासाच्या निमित्ताने श्रीमद भागवत कथा गुरुवर्य श्री भास्करगिरीजी बाबांनी आम्हा भक्तांना दिलेले दिलेले फळ आहे.त्यामुळे मनुष्य जिवाच्या उद्धारासाठी जीवनात श्रीमद भागवत कथा श्रवण करा असे आवाहन त्यांनी यावेळी बोलतांना केले.
यावेळी झालेल्या कथा शुभारंभ प्रसंगी हभप दिनकरजी महाराज मते,गायनाचार्य सचिन महाराज पवार,मृदुगाचार्य दादा महाराज साबळे, संतसेवक बाळू महाराज कानडे, तात्या महाराज शिंदे,शुभम महाराज बनकर,राम महाराज काळे, लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे,बजरंग विधाते,सरपंच अजय साबळे,उपसरपंच भीमाशंकर वरखडे, महेंद्र फलटणे,संदीप साबळे यांच्यासह वारकरी संप्रदायातील महाराज मंडळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रीमद भागवत कथा प्रवक्ते म्हणून देवगड संस्थानचे उत्तराधिकारी भागवताचार्य स्वामी श्री प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या श्रीमुखाद्वारे भागवत कथेचे निरूपण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे दररोज दुपारी ४ ते ५ श्रीसमर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा अभंगवाणी या ग्रंथाचे निरूपण श्री ह भ प नारायण महाराज ससे हे करत आहेत.
आठ दिवस चालणाऱ्या या सप्ताह काळात रोज पहाटे ३-३० ते ४ सनई वादन,४ ते ६ काकडा. श्रींची प्रातः आरती,७-३० ते ८-३० गितापाठ व विष्णू सहस्त्रनाम,८-३० ते ११-३० श्रीमद भागवत कथा,दुपारी ४ ते ५ श्री समर्थ सदगुरु श्री किसनगिरी बाबा अभंगावली निरूपण,सांयकाळी ५ ते ७ हरिपाठ व श्रींची आरती,रात्री ८-३० ते १०-३० हरिकीर्तन,रात्री
११ ते पहाटे ४ पर्यंत नेमलेल्या भजनी मंडळाची जागर होणार आहेत.
रोज रात्री ८.३०ते १०.३० दरम्यान होणाऱ्या किर्तन सोहळयात श्री ह भ प महंत नारायणानंदगिरी महाराज.( वारकरी आश्रम सावखेडा),श्री ह भ प दादा महाराज वायसळ (रामकृष्ण भक्तीधाम लखमापूर),श्री ह भ प महंत उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर (श्री संत तुकाराम महाराज संस्थान नेवासा),
श्री ह भ प पांडुरंगगिरी महाराज (वावी),श्री ह भ प महंत श्री कैलासगिरीजी महाराज(गिरी आश्रम सावखेडा)श्री ह भ प चंदिले नाना (सचिव वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची),
श्री ह भ प महंत स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या कीर्तनाचे कार्यक्रम होणार आहे.
रविवार दि.३० जुलै रोजी रोजी सकाळी ८ ते १० यावेळेत देवगड दत्त पिठाचे प्रमुख महंत गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने आठ दिवस चालणाऱ्या
श्रीमद भागवत कथा व श्री दत्त लक्ष्मी नारायण याग सोहळयाची सांगता होणार असून वरील सर्व अध्यात्मिक व धार्मिक कार्यक्रमाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा तसेच श्रीक्षेत्र देवगड संस्थानच्या नावावर कोणालाही वर्गणी अगर धान्य देऊ नये असे आवाहन क्षेत्र देवगड संस्थानच्या वतीने गुरुवर्य भास्करगिरी महाराजांनी केलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!