ढोरेगांव येथे बसने मोटारसायकलवरील विद्यार्थ्यांना चिरडले यात एका विद्यार्थ्याचा मृत्यू दोन गंभीर


गंगापूर(प्रतिनिधी) छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्गावरील ढोरेगांव येथे पुण्याकडे जाणा-या बसने मोटारसायकल दिलेल्या धडकेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू तर दोन गंभीर जखमी असुन ते न्यु हायस्कूल ढोरेगांवचे विद्यार्थी आहे .


छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्गावरील ढोरेगांव येथे एस टी महामंडळाच्या फलटण डेपोच्या बसने टू व्हीलरला जोरदार धडक दिल्याने एक विद्यार्थी जागेवरती ठार झाला असून दोन गंभीर जखमी आहे. त्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे हे तीनही विद्यार्थी न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय ढोरेगाव येथे बारावीत शिक्षण घेत होते.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार
ढोरेगांव येथील कॉलेज सुटल्यानंतर एका टू व्हीलर वरून तीन विद्यार्थी ढोरेगाव रोड क्रॉस करत असतानी अचानक मध्यभागी आले असता छत्रपती संभाजीनगर वरून पुण्याकडे जाणाऱ्या एम एच १४ बी टी २७९७ बस गाडीने मोटारसायकल क्रमांक एम एच २० ई यु ७१५४ ला जोरदार धडक दिली यामध्ये दोन विद्यार्थी दूर फेकल्या गेले तर एक बसच्या खाली टू व्हीलर सह तब्बल 100 फूट फरपटत गेला. या मध्ये किरण दत्तात्रेय काजळे (१९) राःआनंदवाडी हा विद्यार्थी जागेवर ठार झाला असून गौरव संतोष मिसाळ (१९)
गौरव संजय सुगदान(१९) दोन्ही राः भोयगाव हे गंभीर जखमी आहे.
यांना छत्रपती संभाजीनगर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.
घटनास्थळी विशाल जोशी, सरपंच अयुब पटेल, ग्रामपंचायत सदस्य मुकतार पटेल, राजु जोशी, दिपक वने यांनच्यासह ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेऊन मदत कार्य केले.
घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक झोरे, राहुल वडमारे,
विष्णु बाप्ते, यांनी घटनास्थळी येऊन बस रोडच्या कडेला घेऊन ट्राफिक सुरळीत केली.तर विभागीय वाहतूक अधिकारी पंडित चव्हाण, आगार प्रमुख विठ्ठल धुतमल,
वाहतूक नियंत्रक भाऊसाहेब जाधव,
वाहतूक प्रवेशक नारायण शेळके, आदींनी घटनास्थळी धाव घेतली.
घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला असून सोशल मीडिया वरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!