गंगापूर येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे वाजत गाजत अनावरण


गंगापूर (प्रतिनिधी)गंगापूर येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढुन फटाक्यांच्या अतिशबाजीत करण्यात आले.



राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे ९ फेब्रुवारी शुक्रवार रोजी सकाळी 10 वाजता नाहदी पेट्रोल पंपावर आगमन होताच समाज बांधवांनी धनगरी ढोल, आतिषबाजी, करून स्वागत केले त्या नंतर डीजेच्या तालावर भव्यदिव्य वाजतगाजत मिरवणूक महाराणा प्रताप चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, राजीव गांधी चौक मार्गे गंगापूर कायगांव रोडवरील डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळील नियोजित जागेवर बसविण्यात आला.या मिरवणुकीत
समाज बांधवांनी कडे ,धनगरी ढोल, पारंपारिक वाद्य वाजवून परंपरा कायम ठेवली.या मिरवणुकीत महीला, समाजबांधवासह ,राजकीय नेते सहभागी झाले होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!