२५ विद्यार्थींनिना सायकल वाटप व जामगाव येथील विविध विकास कामांचे उद्घघाटन करण्यात आले

गंगापूर (प्रतिनिधी) जामगाव ग्रामपंचायतीने ग्राम विकास निधी आराखडा अंतर्गत विविध कामाचे उदघाटन गटविकास अधिकारी सुहास वाघचौरे यांच्या हस्ते १५ ऑगस्ट रोजी करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे कुंडलीकराव माने गटशिक्षण अधिकारी समाधान आराक ,माजी सभापती लक्ष्मणभाऊ सांगळे, विनोद काळे, सोसायटी चेअरमन श्रीकांत वाडे, व्हाईस चेअरमन नसीर पटेल ,माजी सरपंच आप्पासाहेब माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
न्यू हायस्कूल रघुनाथ नगर येथे जलशुद्धीकरण आरो प्लांट उदघाटन, पंचवीस विद्यार्थिनींना सायकलीचे वाटप माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी हात धुन्याच्या स्टेशनचे उद्घाटन एक साऊंड सिस्टिम, बोर व इंधन विहिरीचे पाईपलाईनचे उद्घाटन व सायकल स्टॅन्ड चे उद्घाटन करण्यात आले ग्रंथांलयामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पुस्तके भेट देण्यात आली तर जिल्हा परिषद शाळेमध्ये डिजिटल क्लासरूम हात धुन्याच्या स्टेशनचे व शाळेच्या गेटचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सरपंच बशीर पटेल,ग्राम विकास अधिकारी वी.जे. सिरसाठ ग्रामपंचायत सदस्य गोकुळ ठोंबरे,दादासाहेब रोडगे,नितीन तांबे सोमनाथ तागड, गणेश पंडीत, अशोक पगारे दिपक जगताप, किसन बर्वे, अंकुश मोरे,शालेय समिती सदस्य संजय तुपलोंढे,सुनिल बोराटे,साईनाथ इस्टके,भारत तुपलोंढे , भगवान ठवाळ आदींसह ग्रामस्थ शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!