मराठा आंदोलनासाठी उपोषणाला बसलेल्या उपोषणार्थ्याची चिमुकली मुले भेटायला आल्याने उपोषणकर्त्यासह उपस्थिताचे डोळे पाणावले.

मराठा आंदोलनासाठी उपोषणाला बसलेल्या उपोषणार्थ्याची चिमुकली मुले भेटायला आल्याने उपोषणकर्त्यासह उपस्थिताचे डोळे पाणावले.


गंगापूर (प्रतिनिधी)मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या उपोषणार्थ्याची मुले बाप घरी दिसत नसल्याने नातेवाईकांनी उपोषणस्थळी भेटायला आणली असता शहरात चिमुकलीने बापाला मिठी मारुन कुशीत विसावली तर कायगांव टोका येथे भेट होताच बापलेकाच्या डोळ्यात अश्रु आल्याने उपस्थितही गहिवरले.


मराठा आरक्षणासाठी गंगापूर तालुक्यात गावागावात अगोदर तीन दिवस साखळी उपोषणानंतर अन्नत्याग उपोषणाला सुरुवात करण्यात आली असून हुतात्मा काकासाहेब शिंदे स्मृतीस्थळाजवळ गेल्या सात दिवसांपासून देविदास पाटील यांचे अमरण उपोषण सुरू आहे


गेल्या अनेक दिवसापासून आपला बाप कुठे दिसत नाही म्हणून सैरभैर झालेल्या अडीच वर्षाच्या चिमुकलीला भेटण्यासाठी घेऊन आल्यानंतर राहुल सुराशे या बापाला पहाताच चिमुकलीने गळ्यात मिठी मारली व मांडीवर झोपली हे दृश्य पाहून उपस्थितांची मने भाराऊन गेली व उर भरून आला गंगापूर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात अर्जुन पवार, राहुल सुराशे व कायगांव टोका येथे देवीदास पाठे हे उपोषणाला बसलेले आहे कायगांव टोका येथील हुतात्मा काकासाहेब शिंदे यांच्या स्मृतीस्थळाजवळील उपोषणस्थळी मुलगा भेटायला आला असता देविदास पाठे पाटील भाऊक झाले असता बापाच्या व मुलाच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले बापासह उपस्थिताचे डोळे पाणावले. पांडे यांचा उपोषणाचा आज सातवा दिवस असुन प्रकृती अतिशय खालावली आहे.

इकडे आपल्या भविष्यासाठी वडील काय करत आहे हे या निरागस मुलांना काय माहिती.उपोषणाथ्र्यांना पाठिंबा व भेट देण्यासाठी माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी आमदार हर्षवर्धन जाधव आदींसह सर्व समाज बांधव येत आहे शासनाने त्वरित आरक्षण जाहीर करावे अशी मागणी सर्व स्थरातुन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!