सुवर्णाताई जाधव यांच्या संकल्पनेतून शिवजयंतीला विविध स्पर्धांचे आयोजन


गंगापूर (प्रतिनिधी) उत्सव शिवजन्माचा स्वराज्य कार्याच्या स्वराज्य सप्ताहात महीला,मुले व भजनी मंडळासाठी विविध स्पर्धांचे आयोजन राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या प्रदेश सरचिटणीस सुवर्णाताई संजय जाधव यांनी केले आहे
गंगापूर येथील शिक्षक पतपेढी येथे १८ फेब्रुवारी रोजी लहान मुले व मुलां साठी शिवकालीन ऐतिहासिक वेशभूषा ८ ते ९ वाजता,सर्व महिला पारंपारिक वेशभूषेत महाराष्ट्रीयन लुक ९ ते १० वाजता व भजनी मंडळ स्पर्धा १० ते १२ या वेळात होणार आहे शिवजन्मोत्सव रात्री बारा वाजता पाळना हलवून साजरा करणार आहे या सर्व कार्यक्रमांना सर्वांनी मोठ्या संखेने उपस्थिती राहावे असे आवाहन राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या प्रदेश सरचिटणीस तथा संचालिका कृ.उ. बाजारसमिती सुवर्णाताई संजय पा जाधव यांनी केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!