महाराष्ट उद्योग युनिव्हर्स पुरस्काराने गंगापूरच्या अनिता जाधव सन्मानित

गंगापूर (प्रतिनिधी) सिनेअभिनेती वर्षा उसगावकर व स्पृहा जोशी यांच्या हस्ते गायत्री ब्युटी पार्लरच्या संचालिका अनिता राजेंद्र जाधव यांना हॉटेल ताज येथे महाराष्ट उद्योग युनिव्हर्स पुरस्कार देण्यात आला.

छत्रपती संभाजीनगर येथिल हॉटेल ताज येथे महाराष्ट उद्योग (युनिव्हर्स) पुरस्कार २०२४ सोहळा संपन्न झाला. याकार्यक्रमासाठी सिने अभिनेत्या स्पृहा जोशी, वर्षा उसगावकर या उपस्थित होत्या. या पुरस्कार सोहळ्यात गायत्री ब्युटी पार्लर, गंगापूरच्या अनिता राजेंद्र जाधव यांना प्रथम पारितोषिक मिळाले. सिने अभिनेत्री स्पृहा जोशी व वर्षा उसगावकर यांच्या हस्ते अनिता राजेंद्र जाधव यांना हा पुरस्कार देण्यात आला. अनिता जाधव यांच्या गंगापूर मध्ये दोन शाखा आहेत त्याठिकाणी त्या ॲडव्हांस क्लासेस घेतात. त्यांना यापूवीही दुबई, दिल्ली, पुणे याठिकाणी अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!