कुक्कडगाव येथील महामार्गावरील जिल्हा परिषद शाळेला संरक्षण भिंतीसाठी निधी उपलब्ध करू व कुक्कडगावच्या विविध विकांस कामांसाठी प्रयत्न करणार जालना जिल्हा पालकमंत्री अतुल सावे

कुक्कडगाव येथील महामार्गावरील जिल्हा परिषद शाळेला संरक्षण भिंतीसाठी निधी उपलब्ध करू व कुक्कडगावच्या विविध विकांस कामांसाठी प्रयत्न करणार जालना जिल्हा पालकमंत्री अतुल सावे
जालना (प्रतिनिधी)अंबड तालुक्यातील कुक्कडगावच्या विविध विकांस कामांसाठी प्रयत्न करणार जालना जिल्हा पालकमंत्री अतुल सावे यांचे आश्वासन
छत्रपती संभाजीनगर येथे ८ जुलै रोजी जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांची कुक्कडगाव चे सामाजिक कार्यकर्ते तसेच भारतीय जनता पार्टी चे तरुण तडफदार युवा कार्यकर्ते दिपक पटेकर यांनी भेट घेतली .
यावेळी विविध विकास कामांच्या विषयांवर चर्चा करण्यात आली . यामध्ये प्रामुख्याने जालना जिल्ह्यातील मौजै कुक्कडगाव येथील जिल्हा परिषद शाळा हि पहिली ते पाचवी पर्यंत असून विशेष करून हि शाळा अंबड तिर्थापूरी ह्या महामार्गालगत येत असुन. शाळेतील विद्यार्थ्यांना शारीरिक खेळां करीता ठरविक असे मैदान नाही शाळेच्या आधु-या मैदानावर विद्यार्थ्यांना शारीरिक खेळ खेळावे लागते .ते खेळ खेळत असताना रोडवरील ये जा करणा-या चार चाकी, टुव्हिलर, ट्रॅक्टर, अवजड मोठ्या गाड्यांची जास्त प्रमाणात रहदारी असल्यामुळे विद्यार्थ्यांनचा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. येथील विद्यार्थ्यांना जिव मुठीत धरून शारीरिक खेळ खेळावे लागते तसेच याच जिल्हा परिषद शाळेच्या थोड्याच अंतरावर सुखापूरी 33 केव्हि गावठाण चा 64 चा ट्रान्सफॉर्मर आहे. विशेष म्हणजे त्या ट्रान्सफॉर्मर वरुन शाळेच्या बाजूना म्हणजे सुखापूरी परिसरातील ट्रान्सफॉर्मर वरुन कुक्कडगाव येथे गावठाण ट्रान्सफॉर्मर नसल्यामुळे कुक्कडगावातील अनेकांनी सुखापूरी परिसरातील ट्रान्सफॉर्मर वरुन शाळेच्या आवारातुन केबल घेऊन आकडे टाकून गावात लाईट घेतली आहे सध्या वादळ वारा आणि पावसाचे दिवस आहे..यामुळे केबल शाळेच्या परीसरातुन असल्याने एखाद्या वेळी केबल तुटून जर शाळेच्या परीसरात पडले तर करंट उतरण्याची दाट शक्यता असते आणि करंट उतरले तर लहान मुलांच्या जिवितास धोका आहे. या विषयी दिपक पटेकर यांनी अंबड विद्युत वितरण कंपनीचे भोपळे व लाईनमन राठोड यांच्याशी अनेक वेळा संपर्क करुन चर्चा केली. सुचना दिल्या व त्यांच्या निदर्शनास पण आणून दिले तरीदेखील त्यांचे याकडे दुर्लक्ष करून चालढकल पणा करतात.व विद्यार्थ्यांनच्या जिविता सोबत खेळतात तरी पालकमंत्री यांनी याकडे जातीने लक्ष घालून विद्यार्थ्यांच्या आशा अनेक समस्या पासून बचाव करण्यासाठी कुक्कडगाव येथील महामार्गावरील जिल्हा परिषद शाळा शाळेला संरक्षण भिंत हि अत्यंत गरजेची आहे .ती संरक्षण भिंत जिल्हा नियोजन मध्ये घेऊन डीपिटीशी मधून निधी देण्यात यावा अशा अनेक विकास कामांच्या विषयांवर जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्याशी चर्चा करण्यात आली.या वेळी पालकमंत्र्यांचे ओएसडी अशोक दांडगे, शिवाजी पटेकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!