दोन पंचायत समीती.कंत्राटी कर्मचारी सात हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले

दोन पंचायत समीती.कंत्राटी कर्मचारी सात हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले

भोकरदन (प्रतिनिधी) भोकरदन येथील पंचायत समिती कार्यालयात कंत्राटी पदावर काम करत असलेले दोन कंत्राटी कर्मचारी सात हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने टाकलेल्या जाळ्यात अलगत आडकले.

भोकरदन तालुक्यातील दावतपूर येथे सन 2021 मध्ये सार्वजनिक विहीर मंजूर झालेली होती. या मंजूर विहिरीच्या खोदकामाचे अकुशल मजूर यांचे थकीत मस्टर काढण्यासाठी तक्रारदार ग्रामपंचायत सदस्याने भोकरदन पंचायत समिती कार्यालयात वारंवार संपर्क केला. मात्र काम होत नव्हते. शेवटी हे काम करून देण्यासाठी या कार्यालयातील कंत्राटी तांत्रिक सहाय्यक प्रशांत रामेश्वर दहातोंडे व ३९ वर्ष यांनी सात हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली, तसेच कंत्राटी संगणक परिचालक सतीश रामचंद्र बुरांगे व २९ वर्ष यांनी तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालना येथे संपर्क साधला आणि १७ जुलै रोजी दुपारी पंचा समक्ष सात हजार रुपयांची लाच घेताना प्रशांत दहातोंडे याला रंगेहात पकडण्यात आले. त्याच्याकडून सात हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. याच वेळी संगणक परिचालक सतीश बुरांगे यांनी मात्र लाच घेतली नव्हती परंतु पंचा समक्ष लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने या दोघांनाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. भोकरदन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई छत्रपती संभाजीनगरचे लाचलुचपत विभागाचे पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, यांच्या मार्गदर्शनाखाली जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक किरण बिडवे पोलीस अंमलदार शिवाजी जमधडे, जावेद शेख, कृष्णा देठे, चालक प्रविण खंदारे यांच्या पथकाने ही कारवाई केली.


सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.*

किरण एम. बिडवे.
*पोलीस उप अधीक्षक,
*लाचलूचपत प्रतिबंधक विभाग जालना.
मो.नं. 7020224631
Dyspacbjalana@gmail.com
02482220252

@ टोल फ्रि क्रं. 1064

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!