लाठीचार्ज प्रकरण भोवले जालना जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोषी सक्तीच्या रजेवर…

लाठीचार्ज प्रकरण भोवले जालना जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोषी सक्तीच्या रजेवर…

सरकारकडून कारवाईला सुरुवात

जालना (प्रतिनिधी) लाठीचार्ज प्रकरण भोवले जालना जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्याच्या अंतरवाली सराटी गावात गेल्या चार दिवसापांसून लढा देणारे कार्यकर्ते मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात उपोषण सुरु होतं. दरम्यान शुक्रवारी जरांगे यांना पोलीस रुग्णालयात नेण्यासाठी आले असता, आंदोलक आणि पोलिसांत झडप होऊन दगडफेकीसह लाठीचार्ज केला होता लाठीचार्ज चार्ज मध्ये महीला पुरुष व लहान मुले जखमी झाले होते
जालना जिल्ह्यात झालेल्या या घटनेनंतर आता सरकारने कारवाईला सुरुवात केली आहे. गृहमंत्रालयाकडून जालना जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!