भितीदायक..ढेकु पुलाच्या नदी काठावर शेतात नर बिबट्या अस्वस्थ अवस्थेत आढळल्याने खळबळ

भितीदायक..ढेकु पुलाच्या नदी काठावर शेतात नर बिबट्या अस्वस्थ अवस्थेत आढळल्याने खळबळ

वैजापुर (प्रतिनिधी) वैजापूर तालुक्यातील बाभुळगाव ते शिऊर बंगला रोड वरील ढेकु पुलाच्या नदी काठी असलेल्या शेतात बिबट्या अस्वस्थ अवस्थेत आढळल्याने शेतकरी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले असुन वन विभागाचा नाकर्तेपणामुळे पोलीसांना उपचारासाठी नेण्याची वेळ आली आहे.

परिसरातील शेतकऱ्यांनी व नागरीकांनी वन विभागाच्या अधिका-यांना फोन करून ही कोणीही घटनास्थळी आले नाही त्यामुळे अस्वस्थ नर बिबट्याला सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील विशाल पैठणकर, गणेश जाधव व स्थानिक शेतकऱ्यांनी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता या बिबटय़ाला पोलीसांच्या वाहनातून शिऊर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात घेऊन गेले .

बिबट्यावर शिवुर येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांनी उपचार सुरू केले आहे या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून परिसरात आणखी बिबट्या असण्याची शक्यता निर्माण झाली आहे या बिबट्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!