डॉ अरुण ज-हाड यांची धडाकेबाज कामगिरी वैजापूर शहरांमधील रस्त्यावर अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू दुकानदारांचे धाबे दणाणले


वैजापूर (प्रतिनिधी) उपविभागीय अधिकारी डॉ अरुण ज-हाड यांनी आज सायंकाळी पाच वाजेपासून वैजापूर गंगापूर मार्गावरील चौफुली रस्त्यावर झालेले अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली असुन बाबा मिसळ, टेके फरसाण, पानटपरी देशी दारू दुकानदारांनी दुकानासमोरील रस्त्यावर अतिक्रमण करून सेड ठोकून धंदा करत होते यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली याची दखल घेत वैजापूर उपविभागीय सिंघम अधिकारी डॉ अरुण ज-हाड यांनी दोन जेसीबीच्या साह्याने या अतिक्रमणांवर हातोडा हाणला.

या कारवाईमुळे दुकानदारांची धांदल उडाली डॉ ज-हाड यांनी स्वतः बाॅक्स उचलले व कारवाई केली या कारवाईमुळे रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे .या कारवाईमध्ये वैजापूर उपविभागीय अधिकारी डॉ अरुण जराड तहसीलदार सावंत व तलाठी गजानन जाधव आप्पा,देवरुखकर आप्पा, राठोड आप्पा, कान्तेश्वर आप्पा, पेहरकर आप्पा, कावळे ,नितीन आदी सहभागी झाले होते या धडक कारवाई मुळे अतिक्रमण धारकांचे धाबे दणाणले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!