अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते लवकरच बी आर एस पक्षात जाण्याची शक्यता

अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते लवकरच बी आर एस पक्षात जाण्याची शक्यता
अहमदनगर (प्रतिनिधी) अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदारांसह नेते लवकरच बी आर एस पक्षात जाण्याची दाट शक्यता

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवारांचे नगर जिल्ह्यातील निकटवर्तीय नेते माजी आमदार, अशोक नगर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन तसेच अशोक सहकारी बँकेचे चेअरमन व अशोक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भानुदास मुरकुटे तसेच अशोक सहकारी साखर कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर काळे यांनी भारत राष्ट्र समिती पक्षाचे अध्यक्ष मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव साहेब यांची भेट घेतली. भारत राष्ट्र समिती पक्षाचे नेते माजी आमदार अण्णासाहेब माने व नगर जिल्ह्याचे भारत राष्ट्र समिती पक्षाचे नेते घनश्याम शेलार यांच्या पुढाकाराने ही भेट घेण्यात आली असून लवकरच पक्षात प्रवेश घेण्याचा निर्णय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!