लासूर स्टेशन (प्रतिनिधी) ग़ंगापुर तालुक्यातील स्टेशन येथील शब्द सह्याद्री साहित्य प्रतिष्ठान च्या वतीने दरवर्षी नव वर्षाच्या स्वागत प्रीत्यर्थ काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते, प्रतिवर्ष प्रमाणे याहीवर्षी नववर्षाच्या स्वागतार्थ सोमवार दिनांक १ जानेवारी २०२४ रोजी कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे, संमेलनाचे हे सातवे वर्ष असून या पूर्वी महाराष्ट्रातील नामवंत कवी, साहित्यिक नारायण पुरी, अनंत राऊत,शरद धनगर, गेणू शिंदे, गणेश घुले, अविनाश भारती, गुंजन पाटील, धम्मापल जाधव,निलेश चव्हाण, समाधान इंगळे आदींनी संमेलनात सहभाग नोंदविला आहे तर या वर्षी नामवंत गझलकार नितीन देशमुख, एबीपी माझा फेम हास्य कवी नितीन वरणकार, प्रसिद्ध कवी प्रा संजय कावरे, कवी, निवेदक, गझलकार गोपाल मापारी यांचा सहभाग असणार आहे, या वर्षी प्रथमच झालेल्या ऑनलाईन काव्या संमेलनाचे पारितोषिक वितरण व मान्यवरांचा सहभाग असा दर्जेदार कार्यक्रम येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मैदान येथे होत असून सर्व रसिकांनी लाभ घेण्याचे आवाहन संयोजन समितीचे वतीने करण्यात आले आहे.
संबंधित पोस्ट
जलजीवन मिशनमुळे गंगापूर वैजापूर तालुक्यातील १०० वर्षे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.पाणी टंचाईवर मात करण्यासाठी राज्यातील ही पहिली योजना महत्वकांक्षी ठरेल-आमदार प्रशांत बंब
गंगापूर (प्रतिनिधी) छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलजीवन मिशन अंतर्गत गंगापूर वैजापूर तालुक्यातील ३७३ गावे ग्रीड पाणी पुरवठा योजना पंप ग्रहाच्या कामाचा शुभारंभ गुरुवारी १४…
कत्तलीसाठी आणलेल्या ९ गायींची स्थानिक पोलिसांनी केली सुटका, अनेक दिवसांपासून सुरू होता कत्तलखाना.. गोमांस विक्रीसाठी मुंबई येथे नेण्यात येत होते
कत्तलीसाठी आणलेल्या ९ गायींची स्थानिक पोलिसांनी केली सुटका, अनेक दिवसांपासून सुरू होता कत्तलखाना *गोमासविक्रीसाठी मुंबई येथे नेण्यात येत होते*गंगापूर (प्रतिनिधी)शहरातील ख्वाजा नगर मधील एका पत्र्याच्या…
सर्वोत्कृष्ट महिला पोलीस अंमलदार पुरस्काराने शिल्लेगांव पोलिस स्टेशनच्या पोलिस अंमलदार जकीया शेख सन्मानित
गंगापूर (प्रतिनिधी) दिव्य मराठी समूहाकडून आयोजित पोलिस सन्मान २०२४ पुरस्कार शिल्लेगाव पोलिस स्टेशनच्या कर्तव्यदक्ष महिला पोलीस अंमलदार जाकिया शेख यांना”छत्रपती संभाजी नगर ग्रामीण जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट…