संविधान बचाव यात्रेचे गंगापूर शहरात ढोल ताशाच्या गजरात स्वागत

गंगापूर (प्रतिनिधी)रिपब्लिकन सेना संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली निघालेली संविधान बचाव यात्रा पश्चिम महाराष्ट्रातून मराठवाड्यात आगमन होताच गंगापूर शहरात ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले , तसेच लुंबिनी बुद्ध विहार गंगापूर या ठिकाणी कार्यक्रम घेऊन समारोह करण्यात आला.

यावेळी संविधान बचाव यात्रेचे नेतृत्व करणारे समाजभूषण काकासाहेब खंबाळकर , मिलिंद बनसोडे मराठवाडा अध्यक्ष काकासाहेब गायकवाड जिल्हाध्यक्ष पश्चिम राजूभाऊ आढाव जिल्हाध्यक्ष अहमदनगर यांनी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमासाठी जिल्हाध्यक्षपूर्व प्रा शुद्धोधन मोरे जिल्हाध्यक्ष महिला आघाडी मनीषाताई साळुंखे युवा जिल्हाध्यक्ष पश्चिम नाना सूर्यवंशी युवा जिल्हाध्यक्ष पूर्व सचिन शिंगाडे जिल्हा उपाध्यक्ष पूर्व के जी पवार तालुकाध्यक्ष वैजापूर साईराज गवळे युवा जिल्हा उपाध्यक्ष महीला बम ताई , गायकवाड ताई , यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबा भिवसने यांनी केले या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक तालुका अध्यक्ष आनंद भिवसाने शहरध्यक्ष अबू चाऊस, नवनाथ नरवडे, सुरेश वाकडे, गंगापूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले यावेळी ज्येष्ठ नामदेव भिवसने, शांताबाई खाजेकर ,रंगनाथ खाजेकर, सुनील गायकवाड, सलीम चौधरी, किरण खाजेकर ,नवाज खान, भागिनाथ तुपे, विशाल गायकवाड, रफिक , पारखे दाजी , शिरसाट, नारायण फुलारे, सिंगारे दाजी, रवी शिंदे, कडू खाजेकर, मुजीम बाकोदा, राजू खाजेकर, रफिक चौधरी ,शमशु शेख ,संजय पवार, हनीफ शेख, अनिस खान, गंगाधर कदम, अब्रार शेख, सलमान शेख, राहुल सोनवणे, आतिक बागवान, रवी पंडित, अब्दुल्ला बागवान आदींसह रिपब्लिकन सेना सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!