संतोष ज्वेलर्स येथे प्रभु रामलल्लाची आरती करून प्रसादाचे वाटप

गंगापूर (प्रतिनिधी)अयोध्येतील रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त गंगापूर शहरातील संतोष ज्वेलर्स येथे २३ जानेवारी रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास दुकानासमोर गोंवीदशेठ अंबिलवादे व सुनील अंबिलवादे यांचे हस्ते आरती करून मारुती चौक,श्रीराम मंदिरात (१२५) सव्वाशे किलो बुंदीच्या लाडूंचा प्रसादाचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन संतोष अंबिलवादे यांनी केले होते याप्रसंगी माजी नगराध्यक्ष संजय जाधव, सुरेश नेमाडे, संदेश गंगवाल, लक्ष्मीकांत व्यास, रामेश्वर नावंदर, संदीप दांरुटे, अमोल जगताप, राजेंद्र बजाज,योगेश पाटील, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष बाळू गुंदेचा, आशीष शहाणे, सचिन दहीवाळ, गणेश अंबिलवादे संजय फिरोदिया आदींसह महीलांसह रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!