व्यसनाच्या आहारी न जाता कुटुंबाला व्यसनापासून वाचवा : प्रकाश बेले

व्यसनाच्या आहारी न जाता कुटुंबाला व्यवसानपासून वाचवा : प्रकाश बेले

गंगापुर पोलिसांची अंमली पदार्थ विरोधी मोहीम जनजागृतीपर रॅली

गंगापुर (प्रतिनिधी) समाजातील प्रत्येकाने व्यसनाच्या आहारी न जाता कुटुंबाला व्यवसानपासून वाचवा असे आवाहन विभागीय पोलिस अधिकारी प्रकाश बेले यांनी केले.जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्ताने दि.२६ जुन रोजी गंगापुर पोलिसांकडून शहर परिसरात अमली पदार्थाच्या जनजागृतीसाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
व्यासपीठावर,पोलीस निरीक्षक साईनाथ गीते, उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर साजीद शेख,उपप्राचार्य विशाल साबणे,उपनिरीक्षक शकील शेख,उपनिरीक्षक अजहर शेख,उपनिरीक्षक संजय धुमाळ यांची उपस्थिती होती.

सकाळी दहा वाजता शहरातील सर्व शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींच्या रॅलीचे अयोजन करण्यात आले होते.या रॅलीला बेले यांच्या हस्ते हिरवी झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीची विविध फलके घेऊन विद्यार्थी घोषणा बाजी केली.दरवर्षी २६ जून हा दिवस जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून पाळला जातो.नशेमध्ये अडकलेल्या लोकांचे जीवन वाचवणे, जागरूकता करणे हा या दिवसाचा मुळ उद्देश आहे.जगातील २० टक्के टक्के लोक अंमलीपदार्थाच्या अमलाखाली आलेले आहेत. अमलीपदार्थाचे सेवन करून परिवार उद्ध्वस्त होतात.त्यामुळे याला विरोध करण्यासाठी विद्यार्थीदशेतच सुरूवात झाली पाहिजे असे प्रतिपादन साईनाथ गीते यांनी केले.
दरवर्षी २६ जून हा दिवस जगभर जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून विविध विधायक उपक्रमांच्या स्वरूपात साजरा केला जातो. युनोने १९८८ साली याची घोषणा केली. २६ जून या दिवसाला चीनमधील पहिल्या अफू युद्धाच्या काळात (१९८७) अफू व्यापारावर घातल्या गेलेल्या बंदीचा संदर्भ आहे.
होते, ते व्यसनाच्या श्रेणीत येते. अशा काही सवयी आहेत ज्या सोडणे खूप कठीण आहे, जसे की, ड्रग्ज व्यतिरिक्त चहा, कॉफीचा अतिवापर, व्हिडिओ गेम्स, स्मार्ट फोन, फेसबुक इत्यादी आधुनिक उपकरणे देखील व्यसनाच्या श्रेणीत येतात. 

कार्यक्रम यशस्वीतेसाठी गणेश काथार,गोपनीय शाखेचे राहुल वडमारे,अभिजीत डहाळे,कैलास राठोड,ज्ञानेश्वर चव्हाण,लक्ष्मण सपकाळ,वैभव नागरे, संदीप राठोड तेजसिंग राठोड,सुनील राठोड आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!