ब्रेकिंग न्यूज एक कोटीची खंडणी मागणाऱ्या गंगापूर येथील तिघांवर गुन्हा दाखल

एक कोटीची खंडणी मागणाऱ्या गंगापूर येथील तिघांवर गुन्हा दाखल
गंगापूर (प्रतिनिधी) एक कोटीची खंडणी मागणाऱ्या गंगापूर येथील तीनं खंडणी बहादर्रावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील प्रताप साळुंके यांनी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की वाल्मिक सिरसाट , राजेंद्र पवार दोन्ही रा. गंगापुर व कल्याण साळुंके रा.औरंगाबाद यांनी १५ सप्टेंबर रोजी यातील वरील आरोपी यांनी फिर्यादीची दर्जेदार कल्याण ॲग्रो कंपनिची बदनामी करण्याची, तसेच जमीन व कंपनी बळकावण्याची व जीवे ठार मारण्याची धमकी देवुन फिर्यादीस एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करुन दिनांक 15/09/2023 रोजी वाल्मिक सिरसाट याने फिर्यादी कडुन 1,00000/- (एक लाख रुपये ) खंडणी स्वीकारली व बाकी पैशांची मागणी करुन हॉट्सअॅपवर खोटी माहिती टाकुन फिर्यादीची बदनामी केली म्हणुन म्हणुन प्रताप साळुंके यांच्या फिर्यादीवरून कलम-३८४,३८६,५००, ५०६ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि दीपक औटे हे करत आहे .

प्रतिक्रिया:-आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी लढत आहोत अगोदर आम्ही दर्जेदार कल्याण ॲग्रो फार्मर कंपनीच्या सर्व सभासदांना घेऊन पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती त्या तक्रारीची दखल न घेता पोलिसांनी एक महिन्यानंतर आमच्या तिघांच्या विरोधात खंडणीचा खोटा गुन्हा दाखल केला आहे तो गुन्हा जाणुन बुजुन दाखल करण्यात आला आहे आम्ही शेतकऱ्यांच्या मागे ठामपणे उभे असुन अशा कितीही केसेस झाल्या तरीही मी शेतकऱ्यांच्या प्रश्न व हितासाठी लढत राहणार.
वाल्मिक शिरसाट शेतकरी नेता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!